मोठी बातमी! रशियाचा भारताला अमेरिकेसोबतच्या डीलनंतर सर्वात मोठा हादरा, बैठकीत मोठा निर्णय, असं कधी वाटलंच नाही…

भारताची नुकतीच अमेरिकेसोबत मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलनंतर रशियानं आता भारताला मोठा झटका दिला आहे. रशियानं मोठा निर्णय घेतला असून, याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! रशियाचा भारताला अमेरिकेसोबतच्या डीलनंतर  सर्वात मोठा हादरा, बैठकीत मोठा निर्णय, असं कधी वाटलंच नाही...
vladimir putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 3:37 PM

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची रशियासोबत जवळीक वाढली होती, रशिया हा सुरुवातीपासूनच भारताचा मित्र देश आहे. मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षी अचानक टॅरिफची घोषणा केल्यामुळे रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढली. अमेरिकेनं अनेकदा भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली होती. या काळात रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देखील देण्यात आली, जाचा मोठ्या प्रमाणात भारताला फायदा झाला. मात्र भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता सर्व राजकीय समीकरणं बदलले आहेत, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे काही प्रमाणात का असेल रशियामध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं मोठा निर्णय घेतला आहे, हा भारतासाठी भविष्यात मोठा झटका असल्याची शक्यता आहे.

भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता रशियानं मोठी चाल खेळली आहे, रशिया आता पाकिस्तानला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे. इस्तांबुलमध्ये रशियाचे मंत्री दिमित्री स्टानिस्लावोविच आणि पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे, ज्यामध्ये रशिया आणि पाकिस्तानला जोडण्यासाठी थेट विमान सेवा सुरू करण्यावर एक मत झालं आहे. एवढंच नाही तर हवाई कनेक्टिव्हीसोबतच दोन्ही देशांमध्ये रस्त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर देखील भर देण्यात आला आहे.

पाकिस्तानातून रशियामध्ये आता ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात होणार आहे, त्यासाठी ट्रक चालकांना व्हिसाची जी समस्या निर्माण होते, ती दूर केली जाईल असा विश्वासही यावेळी दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एवढंच नाही तर दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देणे, आर्थिक अडथळे दूर करणे तसेच बँकिंग चॅनलचा विस्तार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर रशियाने आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात देखील उत्सुकता दाखवली आहे, रशिया पाकिस्तानच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये आणि स्टील प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us