अहमदाबादमध्ये आजपासून रस्त्याच्या कडेला मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर बंदी !

बंदीवर प्रतिक्रिया देताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, लोकांना हवे ते खायला मोकळे आहे. हा शाकाहारी आणि मांसाहारींचा प्रश्न नाही. लोकांना हवे ते खायला मोकळे आहे. पण स्टॉल्सवर विकले जाणारे खाद्यपदार्थ हानीकारक नसावेत आणि स्टॉल्समुळे वाहतुकीला अडथळा होता कामा नये.

अहमदाबादमध्ये आजपासून रस्त्याच्या कडेला मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर बंदी !
Roadside stalls in Gujarat AFP
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:38 AM

गुजरातमधील अहमदाबाद महापालिके ने आजपासून सार्वजनिक रस्त्यांलगतच्या स्टॉल्सवर मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर आणि शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिघात मांसाहारी वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टॉल्सना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय अहमदाबाद महापालिकेच्या नगर नियोजन समितीने घेतला आहे. मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू होईल, वरिष्ठ नगर नियोजन अधिकारी देवांग दानी यांनी सोमवारी सांगितले. “शहरातील सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असून समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,” ते म्हणाले.

बंदीवर प्रतिक्रिया देताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, लोकांना हवे ते खायला मोकळे आहे. “हा शाकाहारी आणि मांसाहारींचा प्रश्न नाही. लोकांना हवे ते खायला मोकळे आहे. पण स्टॉल्सवर विकले जाणारे खाद्यपदार्थ हानीकारक नसावेत आणि स्टॉल्समुळे वाहतुकीला अडथळा होता कामा नये,” असे मुख्यमंत्री आनंद म्हणाले.

इतर बातम्या-

मराठवाड्याच्या मातीतलं कसदार सोनं, 26 नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या IPS सोमय मुंडेच्या यश अपयशाचा ‘कुटाणा’

Mumbai APMC | वारंवार मागणी करुनही कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोण्या, संतापलेल्या माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन