
दुपारची वेळ होती..हॉस्टलच्या मेसमध्ये रोजच्यासारखे विद्यार्थी लंचसाटी एकत्र जमले होते. ताटं वाढली जात होती. काहींनी जेवायला सुरुवातही केली होती. जेवणाची वेळ आणि पोटात भुकेने कावळे ओरडत असतानाच अचानक मोठा आवाज आला. मोठ्या बॉम्बस्फोटासारखा आवाज आला आणि एअर इंडियाचे विमान थेट छताला धडकले. त्यानंतर अफरातफरी माजली. क्षणात होत्याचं नव्हतं झाले. अनेक विद्यार्थी रक्तबंभाळ झाले. विटेचे तुकडे चेहऱ्यावर, डोक्यात घुसले. काही विद्यार्थ्यांची शुद्धत हरपली. जे शुद्धीवर होते. त्यांनी सहकाऱ्यांना वाचवणे महत्वाचे मानून तशाच अवस्थेत मदतकार्याला हात लावू लागले. चारी बाजूंनी धुर आणि धुळीचे साम्राज्य होते.
बॉम्बस्फोटासारखा आवाज आल्याने सर्वांना आधी बास्ट झाल्याचा समज झाला. त्यामुळे सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. त्यानंतर विमानाचा काही भाग कोसळल्याचे त्यांना दिसले. या संदर्भात फोटो जारी झाले आहेत. त्यात मेसच्या टेबलावर जेवणाचे ताट वाढलेले दिसत आहे. त्यावरुन या अपघाताची तीव्रता जाणते. टेबल,डाळ,चपात्या दिसत आहे. अचानक विमान कोसळल्याने त्यांनी जेवणाचे ताट सोडून ते आपल्या सहकाऱ्यांना शोधू लागले. बॅकग्राऊंडला विमानाच्या शेपटीचा भाग भिंत फाडून घुसलेला दिसत आहे. बचाव पथक या विद्यार्थ्यांना वाचवण्यात गुंग झाल्याचे दिसत आहे.
क्लासनंतर या बहुतांश विद्यार्थी मेसमध्ये लंच करण्यासाठी आले होते. काही गप्पा मारत उभे होते. तर काही जण जेवण करीत होते. त्याच वेळी छतावर काही आदळल्याचा मोठा आवाज झाला. त्याने संपूर्ण इमारतीला हादरा बसला.त्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले. या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना भोवळ आली. काही शुद्धीवर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ढीगाऱ्यात अडकलेल्या आपल्याच मित्रांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. जखमी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना बीजे मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
मेडिकल कॉलेजशी संबंधित काही जण सोशल मीडियावर त्यांना सामोरे जावे लागलेल्या या दुर्घटनेची कहानी शेअर करु लागले.सोशल मीडियावर या पोस्ट शेअर केल्या गेल्या. जे विद्यार्थी हसत खेळत लंचला बसले होते. त्यांच्यावर ही भयानक दुपार पाहण्याची वेळ आली…ही भीती त्यांच्या मनावर कायम कोरली गेली आहे.