AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेबिटकार्ड असेल तर 5 कोटींपर्यंतचा एअर एक्सीडेंट कव्हर, काय आहे प्रोसीजर

डेबिट कार्डवर अनेक प्रकारचे बेनेफिट्स मिळत असतात. यात रिवॉर्ड पॉईंट्स पासून इंश्योरन्स कव्हर पर्यंतच समावेश आहे. डेबिट कार्ड्वर मिळणारे सारे फायदे काय असतात.

डेबिटकार्ड असेल तर 5 कोटींपर्यंतचा एअर एक्सीडेंट कव्हर, काय आहे प्रोसीजर
| Updated on: Jun 12, 2025 | 5:39 PM
Share

विमान प्रवास करताना जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पर्सनल एक्सीडेंट इंश्योरन्स कव्हर देखील मिळत असतो. यात नॉन एअर एक्सीडेंटल इंश्योरन्स आणि पर्सनल एअर एक्सीडेंटल इंश्योरेंस दोन्हींचा समावेश आहे. या एसबीआय पासून ते एचडीएफसी बँकपर्यंत सर्व मोठ्या बँका त्यांच्या डेबिटकार्डवर देखील एक्सीडेंटल इंश्योरेंस कव्हर देत असतात. या काय असते अपघात विमा योजना ते पाहूयात…

एक्सीडेंटल कव्हरसह डेबिट कार्ड्स

SBI Gold (MasterCard/VISA) मध्ये 200000 रुपयांचा पर्सनल एक्सीडेंटल कव्हर- नॉन एअर मिळतो. जो विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देय असतो. तर पर्सनल एअर एक्सीडेंट इंश्योरेंस कव्हर देखील हवाई दुर्घटनेत विमाधारकाच्या मृत्युनंतर मिळत असतो. यात मिळणारी रक्कम 4 लाख रुपये असते.

– SBI Platinum (MasterCard/VISA) मध्ये इंश्योरेंस कव्हर क्रमशः 5 लाख आणि 10 लाख रुपये असते.

– SBI VISA Signature/MasterCard World Debit Card मध्ये पर्सनल एक्सीडेंटल आणि पर्सनल एअर एक्सीडेंटल इंश्योरेंस कव्हर 10 लाख आणि 20 लाख रुपये मिळतो.

– बँक बाजारच्या वेबसाइटवर मिळालेल्या अनुसार, Kotak Bank देखील त्यांच्या Debit Card Insurance कव्हर ऑफर करते. खास बाब म्हणजे यात एअर एक्सीडेंट कव्हर 5 कोटीपर्यंतचा असतो.

या शिवाय, एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक सह अन्य बँकेत देखील डेबिट कार्ड्स आणि बँक अकाऊंटवर इंश्योरेंस कव्हरेज ऑफर करत असतो.

काय असतात एअर एक्सीडेंट कव्हरच्या अटी ?

डेबिट कार्डवर मिळणारा इंश्योरेंस काही अटीनुसार असतो. उदाहरणार्थ एसबीआयच्या डेबिडकार्डवर एअर एक्सीडेंट कव्हरचा फायदा उठवण्यासाठी तिकीट त्याच कार्डवरुन खरेदी केलेली असावी लागते. तसेच कार्डचा वापरही तीन महिन्यांतून एकदा झालेला असावा, अन्य बँका देखील त्यांच्या कार्डवर या अटींवर इश्योरन्स मिळत असतो.

क्लेम कसा करावा ?

डेबिट कार्डवर मिळणारा पर्सनल एक्सीडेंटल आणि पर्सनल एअर एक्सीडेंटल इंश्योरेंस कव्हरशी संबंधीत क्लेमची प्रोसिजर बँकांनुसार वेगवेगळी असू शकते. सामान्यतः खालील प्रमाणे प्रक्रिया असते. जर तुम्ही अपघातात बळी पडला तर बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या संस्थेला कळवा. त्यानंतर तुम्हाला क्लेमची प्रक्रियाबाबत मार्गदर्शन मिळेल.

आवश्यक कागदपत्रे: अपघाताचे स्वरूप आणि घटना यावर अवलंबून, पोलिस अहवाल किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक असू शकतात. म्हणून, सर्व कागदपत्रे सादर करा.

क्लेमचा फॉर्म भरा: बँक ग्राहकांना क्लेमचा फॉर्म देते, हा फार्म संपूर्ण भरून बँकेत सादर करावा लागतो.

क्लेमचा फॉर्म सादर केल्यानंतर, बँक तुमचा क्लेमची तपासणी करते आणि खात्री झाल्यानंतर विमा रक्कम अदा करते.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.