Indian Air Force : इंडियन एअरफोर्स चीफचा मोठा खुलासा, अमेरिकेला धक्का देणारी बातमी

Indian Air Force :भारतीय हवाई दल 93 व्या एअरफोर्स डे ची जोरदार तयारी करत आहे.  8 ऑक्टोंबरला हिंडन एअर फोर्स बेसवर एक भव्य परेड होणार आहे. त्याआधी एअरफोर्स चीफ एपी सिंह यांनी महत्वाचा खुलासा केलाय. हा अमेरिकेसाठी मोठा झटका आहे.

Indian Air Force :  इंडियन एअरफोर्स चीफचा मोठा खुलासा, अमेरिकेला धक्का देणारी बातमी
F-16
| Updated on: Oct 03, 2025 | 2:19 PM

भारतीय हवाई दल 93 व्या एअरफोर्स डे ची जोरदार तयारी करत आहे. या प्रसंगी एअरफोर्स चीफ एपी सिंह यांनी महत्वाचा खुलासा केलाय. ऑपरेशन सिंदूरवेळी इंडियन एअरफोर्सने पाच पाकिस्तानी F-16, JF-17 फायटर जेट्स पाडली. एअरफोर्सचे पीआरओ विंग कमांडर जयदीप सिंह यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये याची संपूर्ण माहिती दिली. एअरफोर्स चीफ एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी दिलेली ही माहिती अमेरिकेसाठी धक्कादायक आहे, कारण F-16 ही अमेरिकेन बनावटीची विमानं आहेत. 8 ऑक्टोंबरला हिंडन एअर फोर्स बेसवर एक भव्य परेड होणार आहे. 6 ऑक्टोंबरला फुल ड्रेस रिहर्सल होईल.

या कार्यक्रमात एअर फोस्र चीफ, नौदल प्रमुख आणि लष्करप्रमुख सहभागी होतील. या दिवशी एअर फोर्सची ताकद, आत्मनिर्भरता आणि देशसेवा दिसून येईल. विंग कमांडर सिंह म्हणाले की, परेडमध्ये अनेक रोमांचक गोष्टी दिसतील. सर्वात खास असेल ध्वज फ्लायपास्ट. यात MI-17 हेलिकॉप्टर ऑपरेशन सिंदूरचा झेंडा घेऊन उड्डाण करेल. हे ऑपरेशन यावर्षीच मोठं अभियान होतं. स्टेटिक डिस्प्लेमध्ये राफेल, Su-30MKI, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि आकाश सरफेस-टू-एअर मिसाइल दाखवले जातील.

या युद्धाची इतिहासात नोंद होईल

ब्रीफिंगचा मुख्य फोकस होता, ऑपरेशन सिंदूर. पहलगाम हल्ल्यानंतरच हे सर्वात महत्वाच अभियान होतं. विंग कमांडरने सांगितलं की, सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. या युद्धाची इतिहासात नोंद होईल. कारण एका लक्ष्यासह हे अभियान सुरु झालेलं. देशाने सीजफायरचा निर्णय घेतला

एका रात्रीत शत्रुला गुडघ्यावर आणलं

आमच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने सर्व खेळ पालटला. लॉन्ग रेंज एसएएम मिसाइल्सनी शत्रुला मागे ढकललं. सरफेस टू एअर मिसाइलने 300 किमीवरच टार्गेट उडवलं, याची इतिहासात नोंद होईल असं विंग कमांडर म्हणाले. कमीत कमी नुकसानीसह आम्ही अचूक हल्ले केले. एका रात्रीत शत्रुला गुडघ्यावर आणलं असं विंग कमांडर जयदीप सिंह म्हणाले.

1971 च्या यु्द्धानंतर पहिल्यांदा इतकं मोठ ऑपरेशन झालं. एअर फोर्सने सिद्ध केलं की ते अचूक, अभेद्य आहेत. एअरफोर्स, नौदल आणि लष्कर तिघांनी मिळवून योजना बनवली व अमलात आणली.

पाचव्या पिढीच विमान विकत घेणार का?

एडवांस्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) आणि रशियन सुखोई-57 बद्दल प्रश्न विचारण्यात आला. एअर चीफ एपी सिंह या बद्दल बोलले की, हा विषय एडीए आणि डीआरडीओच्या क्षेत्रात येतो. मला वाटतं या दशकात हे विमान उड्डाण करेल. तेजस मार्क-1ए सारखं हे कठीण काम आहे. सुखोई-57 वर सुद्धा सर्व पर्यायांचा विचार करु. संरक्षणात एक प्रक्रिया असते, जो काही निर्णय होईल, तो सर्वात चांगला असेल