एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाश्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड, आपत्कालीन लँडिंग, मोठी खळबळ

एअर इंडियाच्या विमानाबद्दल एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी पुढे येताना दिसत आहे. एअर इंडियाचे विमान रविवारी सकाळी दिल्लीहून इंदूरला निघाले होते. विमानाने टेकऑफ करताच आगीचे संकेत मिळाले. यानंतर एकच खळबळ उडाली.

एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाश्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड, आपत्कालीन लँडिंग, मोठी खळबळ
Air India flight
| Updated on: Aug 31, 2025 | 10:19 AM

एअर इंडियाच्या विमानाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी बातमी पुढे येताना दिसतंय. दिल्लीहून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानामध्ये आग लागल्याचे संकेत पायलटला मिळाली. यानंतर थेट खळबळ उडाली. एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघाले असताच इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती पायलटला मिळाली आणि याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांना देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी पायलटने मागितली. त्यानंतर पायलटने सावधानता राखत हे विमान सुरक्षित उतरवले. यावेळी दिल्ली विमानतळावर ग्राउंड स्टाफला सतर्क राहण्याचे आदेश दिले.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा काही दिवसांपूर्वीच मोठा अपघात झाला. या विमानाला देखील आग लागली होती. विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत राहिला. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. विमान टेकऑफ करण्याच्या काही सेकंदामध्येच विमानाला आग लागली होती आणि विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन धडकले होते. ही घटना ताजी असतानाच आता परत एअर इंडियाच्या विमानाला आगीच्या कारणामुळेच आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय.

मिळालेली अधिक माहिती अशी की, एअर इंडियाचे विमान रविवारी सकाळी दिल्लीहून इंदूरला निघाले होते. विमानाने टेकऑफ करताच आगीचे संकेत मिळाले. विमानाच्या उजव्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पायलटने वेळ न घालता याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि तत्काळ लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर लगेचच ही अधिकाऱ्यांनी विमानाला परवानगी दिली आणि इंदूरला निघालेल्या विमानाची लँडिंग दिल्ली विमानतळावर करण्यात आली.

एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI2913 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे येतंय. रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी इंदूरला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI2913 ला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित विमानाच्या बाहेर काढण्यात आले. कॉकपिट क्रू मेंबर्सना उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. पायलटने सर्वात अगोदर ते इंजिन बंद केले आणि विमान सुरक्षित उतरवले. आता या विमानाची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळतंय.