Air India Plane Crash : प्लेन क्रॅशमध्ये सगळं विमान नष्ट होतं? पण ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो? काय टेक्नोलॉजी आहे?
Air India Plane Crash : विमान अपघातात ते जमिनीवर कोसळलं, तर स्फोट होऊन आग लागते. आता अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्यानंतर आग लागली. अशा अपघातात विमान आगीत जळून खाक होतं, पण ब्लॅक बॉक्स कसा वाचतो? त्यामागे काय टेक्नोलॉजी आहे? ब्लॅक बॉक्समुळे कसं समजत, कुठल्याही विमान अपघाताच कारण.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. एअर इंडियाच प्रवासी विमान कोसळलं आहे. या विमानात 242 प्रवासी आहेत. अहमदाबादच्या मेघानी भागात ही विमान दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर आकाश काळ्या धुराने व्यापून गेलय. या भीषण विमान अपघातात किती जिवीतहानी झालीय, त्याची माहिती अजून समोर आलेली नाही. कुठल्याही विमानाच अपघात झाल्यानंतर लगेच एका खास पार्टचा शोध घेतला जातो. विमानातला हा खास पार्ट कुठला? आणि तो कोण घेऊन जातो? या बद्दल जाणून घ्या.
कुठलीही विमान दुर्घटना घडल्यानंतर प्लेन क्रॅशच्या कारणांचा शोध घेतला जातो. त्यासाठी काही प्रोटोकॉल असतात, ते फॉलो केले जातात. विमान कोसळल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन, सुरक्षा पथकं, अग्निशमन दल आणि इमर्जन्सी सर्विसेस पोहोचतात. प्लॅन क्रॅशनंतर सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. त्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपीट वॉइस रेकॉर्डर (CVR) म्हटलं जातं. हे रेकॉर्डिंग डिवाइस असतं. यात प्लेन उड्डाणाच्यावेळचं कॉकपीटमधील बोलण आणि उड्डाणाचा डाटा रेकॉर्ड असतो.
ब्लॅक बॉक्स का महत्त्वाचा?
प्लेन क्रॅशनंतर ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विमान कसं कोसळलं? त्यामागे काय कारण आहेत? हे शोधून काढता येतं. त्यामुळे तो महत्त्वाचा पार्ट आहे. विमान कोसळल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी स्पेशली ट्रेन एअर क्रॅश इन्वेस्टिगेशन टीम तयार केली जाते. ही टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याच काम करते. भारतात नागरी विमान महासंचलानलय आणि एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोकडून ही टीम पाठवली जाते.
ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो?
बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की, प्लेन क्रॅशमध्ये जेव्हा संपूर्ण प्लेन नष्ट होतं, त्यावेळी ब्लॅक बॉक्स कसा वाचतो?. तुम्हाला सांगतो, ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही, कारण तो टायटेनियम पासून बनलेला असतो. अपघाताच्यावेळी सुद्धा तो सुरक्षित असतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका मजबूत बॉक्समध्ये ठेवलं जातं.
पाण्यात ब्लॅक बॉक्स कसा सापडतो?
ब्लॅक बॉक्समध्ये खास पद्धतीचा लोकेटर बीकन लावलेला असतो. विमान अपघात झाल्यानंर 30 दिवसापर्यंत तो सिग्नल पाठवत असतो. एखाद प्लेन जमिनीवर क्रॅश झालं असेल, तर ढिगारा हटवून तो शोधला जातो. पाण्यात असतानाही ब्लॅक बॉक्स सिग्नल पाठवत असतो.
