Air India Plane Crash – लंडन फिरायला निघालेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू, उद्योगपतीवर दु:खाचा डोंगर कोसळला

एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबाद विमानतळावरुन टेक ऑफ घेताच अवघ्या काही मिनिटांत अपघात झाला. त्यामुळे या विमानातील तब्बल 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

Air India Plane Crash – लंडन फिरायला निघालेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू, उद्योगपतीवर दु:खाचा डोंगर कोसळला
| Updated on: Jun 12, 2025 | 11:02 PM

अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झाले आणि यात 204 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला आहे. एक महिलेचे विमान मिस झाल्याने ती सुदैवाने बचावल्याचे उघडकीस आले आहे. आता विमान दुर्घटनेतील मृत्यूमुखी पावलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या विमान अपघातात लंडनला फिरायला निघालेल्या दोघा बहिण -भावांचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघातात उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहिण- भावाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघे बहिण- भाऊ लंडन फिरायला निघाले होते. त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्दैवी शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुले आहेत. शुभ आणि शगुन हे महिनाभराच्या सुट्टीवर लंडनला फिरायला निघाले होते.

२०४ प्रवाशांचा मृत्यू

तसेच या विमानात उदयपूरचे वर्दीचंद मेनारिया आणि प्रकाशचंद मेनारिया हे दोन भाऊ देखील लंडनला नोकरीसाठी जात होते. ते लंडनला हॉटेलमध्ये शेफची जॉब करतात. या विमानात २०४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे ड्रीमलाइनर विमान बोईंग 787-8 विमान होते.यात 242 प्रवासी प्रवास करीत होते. त्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स, ज्यात 2 पायलट असे मिळून 242 प्रवासी प्रवास करीत होते.