Plane Crash – दहा मिनिटं लेट अन् फ्लाईट मिस झाली, पण जीव वाचला, म्हणाली बाप्पा पावला…
पतीकडे जायला मिळणार नाही म्हणून त्या नशिबाला दोष देत होत्या. त्या दुपारी 1.30 वाजता त्यांच्या अहमदाबाद येथील माहेरी निघून गेल्या आणि हेच विमान अपघातग्रस्त झाल्याचे त्यांनी बातम्यांमध्ये पाहीले तेव्हा त्यांना हादराच बसला....

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बहुतांशी सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत असतानाच एक प्रवासी सुदैवाने वाचल्याचे उघडकीस आले.हा प्रवासी इमर्जन्सी विण्डोच्या बाजूलाच बसला असल्याने बाहेर फेकला गेल्याने बचावला. परंतू याच विमानाने जाणारी एक महिलेचे हे विमान दहा मिनिटांसाठी मिस झाले आणि तिचे प्राण बचावले. ही महिला ट्रॅफीक जाममुळे वेळेत बोर्डींगसाठी पोहचू शकली नाही. अखेर त्यामुळे तिचा जीव बचावल्याने तिने गणपती बाप्पा पावल्याचे म्हटले आहे.
भूमी चौहान यांचे फ्लाईट दहा मिनिटांसाठी मिस झाले. त्यानंतर त्या हताश होऊन नशीबाला दोष देत असतानाच या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त त्यांना कळले. त्यावेळी भूमी चौहान अक्षरश:थरथरु लागल्या.मी सुदैवाने बचावले या मागे गणपती बाप्पाच मला पावल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावर पोहचण्यासाठी ट्रॅफीकमुळे त्यांना दहा मिनिटे उशीरा झाला आणि प्रवासी बोर्डिंग पास एरियातून पुढे पोहचल होते. त्यामुळे त्यांचे विमान थोडक्यात मिस झाले. परंतू त्यामुळे त्यांना नवे जीवनदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मला काय बोलावे हे सूचना
भूमी चौहान लंडनच्या रहिवासी आहेत. सध्या सुट्टीनिमित्त त्या माहेरी अहमदाबादला आल्या होत्या. गुरुवारी त्या एअर इंडियाच्या याच विमानाने लंडनला पतीकडे परतणार होत्या. त्यांना नशिबाने फ्लाईट पकडण्यास उशीर झाला त्यामुळे त्या अलगत बचावल्या. पतीकडे जायला मिळणार नाही म्हणून त्या नशिबाला दोष देत दुपारी 1.30 वाजता घरी निघून गेल्या आणि हेच विमान अपघातग्रस्त झाल्याचे त्यांनी बातम्यांमध्ये पाहीले त्यावेळी त्यांना काय बोलावे हे सूचना त्यांनी मनोमन गणपती बाप्पाचे आभार मानले.
बाप्पाने मला वाचवले..
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि यात 204 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच विमानातून भूमी चौहान ही महिला प्रवास करणार होती. पण दैव बलवत्तर म्हणून विमानतळावर पोहचायला तिला 10 मिनिटे उशीर झाला आणि तिचा जीव वाचला. ट्रॅफिकमुळे भूमी लेट झाल्याने त्यांचे फ्लाईट चुकले. गणपती बाप्पांनीच मला वाचवले, अशी प्रतिक्रिया भूमी यांनी दिली आहे. ‘मी पूर्ण ब्लँक झाले आहे. मी देवाचे आभार मानते. माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवले’,असेही त्या पुढे म्हणाल्या.
