Plane Accident : एअर इंडियाचं विमान वीजेच्या खांबाला धडकलं!

आंध्र प्रदेशातील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय. सुदैवानं विमानातील सर्व 64 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

Plane Accident : एअर इंडियाचं विमान वीजेच्या खांबाला धडकलं!
| Updated on: Feb 20, 2021 | 9:59 PM

नवी दिल्ली : 64 प्रवाशांना घेऊन निघालेलं एअर इंडियाचं विमान एका वीजेच्या खांबाला धडकल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय. सुदैवानं विमानातील सर्व 64 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे विमान गन्नवरम इथं वियवाडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंग दरम्यान वीजेच्या खांबाला जाऊन धडकलं.(Air India plane crashes at Vijayawada airport)

विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक जी. मधुसूदन राव यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात 64 पवासी होते. अपघातानंतर हे सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सही सुरक्षित आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे विमान दोहावरुन आलं होतं. विजयवाडा विमानतळावर लँड करताना विमानाला अपघात झाला आहे.

चौकशीचे आदेश

अपघातानंतर रनवेवर तातडीने फायर ब्रिगेडची गाडी आणि एअरपोर्ट सुरक्षा यंत्रणेचे जवान पाठवण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश विमानतळ प्रशासनानं दिले आहेत.

इतर बातम्या :

RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी

Delhi Violence : लाल किल्ल्यावरील हिंसाचारात सहभागी 20 जणांचे फोटो प्रसिद्ध, दिल्ली पोलिसांकडून शोधमोहीम हाती

Air India plane crashes at Vijayawada airport