RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी

रेल्वे विभागाने एनटीपीसी (RRB NTPC) परीक्षेबाबत मोठा निर्णय घेताला आहे. यानुसार रेल्वे विभागाने नोटीस काढत 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणाऱ्या एनटीपीसी परीक्षा (RRB NTPC Exam) रद्द केल्या आहे.

RRB NTPC Exam: या शहरातील परीक्षा रद्द, रेल्वे विभागाकडून नोटीस जारी
रेल्वे
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:48 PM

नवी दिल्ली : रेल्वे विभागाने एनटीपीसी (RRB NTPC) परीक्षेबाबत मोठा निर्णय घेताला आहे. यानुसार रेल्वे विभागाने नोटीस काढत 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणाऱ्या एनटीपीसी परीक्षा (RRB NTPC Exam) रद्द केल्या आहे. जयपूरच्या ग्लोबल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे (सेंटर कोड : 2441) 22 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021 या काळात ही परीक्षा होणार होती. रेल्वेने याबाबत अधिकृत नोटीस (RRB Notice) जारी करत ही माहिती दिली. याबाबत रेल्वेच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलीय (Railway department canceled RRB NTPC Exam of 4th phase).

रेल्वेच्या नोटीसमध्ये परीक्षा रद्द करण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, नेमकं कोणतं कारण याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. या काळात परीक्षा देणाऱ्यांना आता 5 व्या टप्प्यातील परीक्षांमध्ये सहभागी करुन घेतलं जाणार आहे. परीक्षा रद्द झाल्याची माहिती सर्व परीक्षार्थींना व्हावी म्हणून रेल्वे परीक्षा विभागाकडून सर्वांना एसएमएस आणि ईमेल पाठवण्यात येत आहेत.

रेल्वेकडून 5 व्या टप्प्यातील परीक्षा जाहीर झाल्यानंतर सर्व परीक्षार्थींना आपल्या परीक्षेची तारीख आणि ठिकाण कळणार आहे. RRB ने नोटीसमध्ये म्हटलं आहे, “परीक्षेबाबत उमेदवार कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी किंवा मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात. याशिवाय अधिकच्या माहितीसाठी वेळोवेळी आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरील अपडेट्सही पाहाव्यात.”

सध्या एनटीपीसी भरती परीक्षेचा चौथा टप्पा सुरु आहे. याची प्रक्रिया 3 मार्चपर्यंत चालणार होती. यात 15 लाख उमेदवार बसणार होते. रेल्वे भरती मंडळाने 35 हजारपेक्षा अधिक पदांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. एनटीपीसी भरतीसाठी एकूण 1 कोटी 25 लाख तरुणांनी अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी 23 लाख, दुसऱ्या टप्प्यात 27 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 28 लाख तरुणांनी याआधीच ही परीक्षा दिलीय.

पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही एकप्रकारे स्क्रीनिंग टेस्ट आहे. ही परीक्षा कम्प्युटरवर होते. या परीक्षेत गणित, जनरल इंटेलिजन्स आणि बुद्धीमत्तेसह सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ लागतो.

हेही वाचा :

भारतीय सुरक्षा दलात भरती व्हायचंय? मग ही तुमच्यासाठी मोठी संधी, अर्ज करण्याची सोपी पद्धत

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !

‘मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र आलेत; मग अठरापगड जातीचे मावळे गोळा करुन ओबीसी आरक्षण वाचवू’

व्हिडीओ पाहा :

Railway department canceled RRB NTPC Exam of 4th phase

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.