
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ( SVPIA ) उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आली आहेत. या लंडनला जाणारे हे अपघातग्रस्त विमान ड्रीमलायनर बोईंग 787 होते. हे विमान लांबपल्ल्याचे असून अत्यंत आधुनिक बनावटीचे होते. अशा प्रकारच्या विमानांना इंधन कमी लागते. अनेक अत्याधुनिक सुविधा या विमानात होत्या. एअर इंडियाकडे या प्रकारची 29 ड्रीमलायनर विमाने आहेत. टाटाने एअर इंडियाला टेकओव्हर केल्यानंतर आणखी 20 विमानांची ऑर्डर दिलेली होते.
अहमदाबादेतून एअर इंडियाचे विमान अहमदाबाद ते लंडन जात असताना टेकऑफ होत असतानाच ते कोसळले. या विमानात 242 प्रवासी असून हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर मॉडलचे होते. बोईंगचे हे मॉडल अन्य मॉडल पेक्षा अधिक सुरक्षित मानले जात असून वजनाने देखील हलके होते. हे दोन इंजिनाचे लांबपल्ल्याचे रुंद आकार असलेले विमान होते.बोईंग कंपनीने यास विकसित केले असून त्याचे अधिकृत नाव Boeing 787 आहे.हे एडव्हान्स तंत्राचे विमान कमी इंधन आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखले जाते.
बोईग 787 ड्रीमलायनर एक अत्याधुनिक, लांब पल्ल्याचे विमान होते. ज्या तीन मॉडलना सादर केले आहे. त्यात – 787-8, 787-9 आणि 787-10. हे विमान 242 ते 330 प्रवाशांना घेऊन उडण्यास सक्षम आहे. या विमानाचे 787-9 व्हर्जनच्या उड्डाणाचा पल्ला 14,010 किलोमीटर पर्यंत आहे., त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी त्याची उपयुक्ता सिद्ध होते.याची क्रूज गती (Mach 0.85) सुमारे 903 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.
ड्रीमलायनर ढाचा सुमारे 50 प्रतिशत कंपोझिट म्हणजे कार्बन फायबर मटेरिअल पासून बनलेला आहे. त्यामुळे हे विमान हलके आणि मजबूत होते. तसेच कमी इंधन लागणारे म्हणून ओळखले जाते. जुन्या विमानांच्या तुलनेत या विमानांना 20 ते 25 टक्के कमी इंधन लागते. या विमानाला प्रवाशांसाठी मोठे काचा, उत्तम केबिन प्रेशर, कमी आवाज आणि मूड लायटिंग सारख्या आधुनिक सुविधा दिलेल्या असल्याने प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक होतो.