अकवान चक्रीवादळाचा धसका… थेट राज्यभरात सुट्टी जाहीर, आजच…

अकवान चक्रीवादळामुळे ओडिशा सरकारने 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात सुट्टी जाहीर केली आहे. गंजाप, गजपतीसह काही जिल्ह्यांत 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहतील. दिल्ली, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशात मात्र शाळा व महाविद्यालये सुरू राहणार आहेत. तामिळनाडूत स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

अकवान चक्रीवादळाचा धसका... थेट राज्यभरात सुट्टी जाहीर, आजच...
Akwan Cyclone
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 1:42 AM

ऐन थंडीच्या दिवसात चक्रीवादळानं डोकं वर काढलं आहे. ओडिशात अकवान चक्रीवादळ येणार आहे. केवळ ओडिशातच नव्हे तर या वादळाचा तडाखा अनेक राज्यांना बसणार आहे. ओडिशासह दिल्ली, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशात या वादळाचा मोठा तडाखा बसणार आहे. त्यामुळे वादळाचा सामना करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओडिशात आज 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यता आली आहे. संपूर्ण राज्यभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, इतर राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. आज रात्रीपर्यंत काही राज्य शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अकवान चक्रीवादळ येणार असल्याने ओडिशा सरकारने शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील गंजाप, गजपती, पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाडा आणि कंधमाळ जिल्ह्यांमध्ये 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत सरकारी, अनुदान प्राप्त तसेच खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय खोरधा, मलकानगिरी, रायगडा आणि कोराटपूट जिल्ह्यात शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी शाळा बंद राहणार आहेत.

Loading...

देशाची राजधानी दिल्लीत आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिल्लीत शाळा, महाविद्यालये सुरू राहणार आहेत. बिहारमध्येही शुक्रवारी शाळा सुरू राहणार आहे. बिहारमध्ये दिवाळी आणि छठपूजेच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे या भागात सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

तामिळनाडूत सुट्टी नाही

तामिळनाडूतही कोणतीही सुट्टी दिलेली नाही. मात्र, राज्यात अतिवृष्टी झाल्यास सुट्टी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी सर्कूलरकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरीकडे पश्चिम बंगाल बोर्डाच्या 2026च्या कॅलेंडरमध्ये 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे या राज्यातही शाळा सुरू राहील. मात्र, सीबीएसई, आयसीएसई शाळा आणि खासगी शाळांचे शेड्यूल वेगळे असू शकतात.

राजस्थान आणि हिमाचलमध्ये काय?

राजस्थानात 4 ते 15 नोव्हेंबर पर्यंत सहामाहीच्या सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. या सुट्ट्या संपल्या असून 16 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे उघडतील. तर हिमाचल प्रदेशातही अद्याप सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us