AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्व पक्षांची एकजुट; सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, दोन तास चालेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्व पक्षांची एकजुट; सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 9:12 PM
Share

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, दोन तास चालेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. सर्व पक्षीय नेत्यांकडून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध कण्यात आला आहे. आम्ही सरकार सोबत आहेत, या प्रकरणात आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचं समर्थ करू असं यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर सुरक्षा व्यवस्थेमध्ये नेमकी काय चूक झाली, यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली, आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत ठामपणे उभे आहोत असं टीएमसीचे नेते सुदीप बंद्योपाध्याय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही घटना खूप दुख:दायक आहे, या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक महत्त्वाची पाउलं उचलली जात आहेत, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.

Follow Us
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा