AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार!

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायामूर्तींनी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्व न्यायधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत.

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार!
supreme court
| Edited By: | Updated on: Apr 03, 2025 | 5:36 PM
Share

Supreme Court Judge Wealth Decसlaration : काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात एकच गजहब उडाला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे कोट्यवधीची रोकड कुठून आली, असा सवाल विचारला जाऊ लागला. असे असतानाच सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत.

नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापली संपत्ती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल रोजीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आता सरन्यायाधीशांसहित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती सरन्यायाधीशांना दिली होती.

आतापर्यंत कोणी-कोणी संपत्तीची माहिती दिली?

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 आहे. यात सध्या एक पद रिक्त आहे. यातल्या 30 न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती न्यायालयाला दिली आहे. मात्र न्यायाधीशांनी दिलेल्या संपत्तीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फक्त ज्या न्यायाधीशांनी आतापर्यंत संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे, त्यांची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकान्त, न्यायमूर्ती अभय.एस. ओका, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी, न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना आणि इतर न्यायमूर्तींचा समावेश आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरण नेमक काय आहे?

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. ही रोकड नेमकी कुठून आली यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 22 मार्च रोजी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती. 14 मार्च 2025 रोजी वर्मा यांच्या राहत्या घरी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आले होते. आग विझविताना या जवानांना कोट्यवधीची रोकड दिसली होती. आगीत अनेक नोटा जळून गेल्या होत्या. या पैशांचे काही व्हिडीओही समोर आले होते. त्यानंतरच सर्व न्यायाधीशांनी आपापली संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...