AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona 4th Wave | ..चौथ्या लाटेची नांदी? ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरियंटचा महाराष्ट्रात फैलाव, जाणून घ्या, लक्षणं नेमकी काय आहेत?

ओमिक्रॉन व डेल्टा व्हेरियंटच्या (DELTA VARIENT) संयोगाने ‘डेल्टाक्रॉन’ची उत्पत्ती झाल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात या सात राज्यांचा ‘डेल्टाक्रॉन’ प्रभावित राज्यांमध्ये अंतर्भाव होतो.

Corona 4th Wave | ..चौथ्या लाटेची नांदी? ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरियंटचा महाराष्ट्रात फैलाव, जाणून घ्या, लक्षणं नेमकी काय आहेत?
आता आणखी एका लाटेचा धोका?Image Credit source: Economic Times
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 25, 2022 | 6:48 PM
Share

नवी दिल्ली : कोविडची तिसरी लाट विरळ होत असताना चौथ्या लाटेच्या चर्चेनं जोर धरला आहे. कोविड संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘डेल्टाक्रॉन’ (DELTACRON) व्हेरियंटन पुन्हा डोक वर काढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासहित सात राज्यांत डेल्टाक्रॉनच्या संसर्गानं बाधित रुग्णांच्या शक्यतेनं आरोग्य विभागाच्या गोटात धडकी भरवली आहे. मात्र, सर्व रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले असून अद्यापपर्यंत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. ओमिक्रॉन व डेल्टा व्हेरियंटच्या (DELTA VARIENT) संयोगाने ‘डेल्टाक्रॉन’ची उत्पत्ती झाल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात या सात राज्यांचा ‘डेल्टाक्रॉन’ प्रभावित राज्यांमध्ये अंतर्भाव होतो. डेल्टाक्रॉन विषाणू बाधित पहिला रुग्ण फेब्रुवारी 2022 मध्ये पॅरिसमध्ये आढळला होता. ‘डेल्टाक्रॉन’ विषाणूची लक्षणे पूर्वीच्या विषाणूपेक्षा भिन्न आढळून आली होती.

डेल्टाक्रॉनची मुख्य लक्षणे

राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेन डेल्टाक्रॉनच्या लक्षणाबाबत माहिती दिली आहे. गेल्या तीन लाटांमध्ये आढळलेल्या कोविड लक्षणांसापेक्षच साधर्म्य डेल्टाक्रॉनच्या बाबतीत दिसून आलं आहे. डेल्टाक्रॉन संसर्गित रुग्णाला सौम्य तसेच गंभीर स्वरुपातील लक्षणे देखील जाणवू शकतात. तीव्र डोकेदुखी, घाम येणे, अशक्तपणा, दम लागणे, घशात खवखव, हद्याचे ठोके वाढणे आदी लक्षणे जाणवू शकतात. डेल्टाक्रॉनवरील नवीन अभ्यासानुसार, चक्कर येणे तसेच थकवा ही लक्षणे दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टाक्रॉनमुळे पोटाच्या प्रकृतीवर देखील परिणाम जाणवतो आहे. पोटदुख, पोटात जळजळ आदी लक्षणे डेल्टाक्रॉन बाधित रुग्णांत दिसून येत असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे.

जगभरात डेल्टाक्रॉन बाधितांची संख्या अद्याप नगण्यच आहे. त्यामुळे डेल्टाक्रॉनची दाहकता अद्याप स्पष्ट झाली नाही. आगामी काळात डेल्टाक्रॉन बाधितांच्या नमुन्यांवरुन अंदाज लावता येईल असे मत अभ्यासकांनी वर्तविले आहे.

चौथी लाट जूनमध्ये?

आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात भारतात कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट जूनपासून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल. ही लाट जवळपास चार महिने राहू शकते, असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. आयआटी कानपूरमधील संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेलवर हा अंदाज जारी करण्यात आला आहे. आयआयटी कानापूरमधील गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या :

शरीरात काही लक्षणं दिसून आल्यास व्हा सावध, तुम्हाला टाईप-2 मधुमेहाचा त्रास होऊ शकतो

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झालीय ? चुकून ही दुर्लक्ष करू नका ही लक्षणे अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम !

टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ