Health : शरीरात काही लक्षणं दिसून आल्यास व्हा सावध, तुम्हाला टाईप-2 मधुमेहाचा त्रास होऊ शकतो

अलीकडेच वेगवेगळ्या आजारांमुळे लोक आरोग्याविषयी अधिक सतर्क असल्याचं दिसून येतं. सध्या टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकदा मधुमेह झाला की तो कधीच संपत नाही. हा आजार टाळण्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेणे आवश्यक आहे.

Health : शरीरात काही लक्षणं दिसून आल्यास व्हा सावध, तुम्हाला टाईप-2 मधुमेहाचा त्रास होऊ शकतो
मधुमेहImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:15 PM

मुंबई : अलीकडेच वेगवेगळ्या आजारांमुळे लोक आरोग्याविषयी (Health) अधिक सतर्क असल्याचं दिसून येतं. सध्या टाईप-2 मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांमध्ये लक्षणीय (Symptoms) वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकदा मधुमेह झाला की तो कधीच संपत नाही. हा आजार टाळण्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेणे आवश्यक आहे. धावत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारात शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. डॉक्टरांच्या मते मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार-1 आणि दुसरा प्रकार-2. आता टाईप 2 मधुमेहाची प्रकरणे अधिक दिसून येत असल्याची तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत. इंटरनॅशनल डायबिटीज फाउंडेशनच्या मते, जगभरात 537 दशलक्ष प्रौढ आहेत. लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या मुलांमध्येही या प्रकारचा मधुमेह दिसून येतो. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे टाईप-2 मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

तज्ज्ञ काय सांगतात!

फिजिशियन डॉ. कमलजीत सिंग सांगतात की टाईप-2 मधुमेहाची प्रकरणं आता अधिक दिसून येत आहेत. हा आजार फारसा जीवघेणा नसला तरी त्याची लक्षणं दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉ.  सिंग यांच्या मते, ज्या लोकांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि भरपूर मद्यपान किंवा धूम्रपानाची सवय आहे. त्यांना हा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराचे कारण म्हणजे शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते.

अवेळी जेवण घातक

टाईप-2 मधुमेह काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही होतो. एकदा मधुमेह झाला की तो कधीच संपत नाही. तुम्ही फक्त त्यावर नियंत्रण ठेवू शकता. हा आजार टाळण्यासाठी चांगली जीवनशैली जगणे आवश्यक आहे. आहाराची काळजी घ्या, रोज किमान अर्धा तास व्यायाम करा. जीवनात अनावश्यक मानसिक ताण घेऊ नका. मधुमेह कोणत्याही कारणाने झाला असेल, तर नियमितपणे रक्तातील साखर तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहाराकडे लक्ष द्या.

मधुमेहाचे प्रकार किती?

टाईप-1 आणि टाईप-2 मधुमेहामध्ये बराच फरक असल्याचं डॉक्टर सांगतात. टाईप-1 मधुमेह आनुवंशिक कारणांमुळे होऊ शकतो. यामध्ये तरुण वयातही व्यक्ती मधुमेहाची शिकार होऊ शकते. तर टाइप-2 मधुमेह होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली. त्यामुळे जवणाच्या वेळा, व्यायाम या गोष्टी वेळेवर करायला हव्यात.

टाईप-2 मधुमेहाची लक्षणं

  1. भूक लागते
  2. अंधुक दृष्टी
  3. वारंवार मूत्रविसर्जन
  4. दुखापती लवकर बरी न होणं
  5. खाजगी भागावर खाज सुटणे
  6. खूप तहान लागणे

इतर बातम्या

Beed मध्ये काका पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते फोडले, कधी होणार पक्षप्रवेश?

नागपूर विद्यापीठात Universal Health कोर्स, फक्त रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त व्हा

Health : जीवन शैलीतील बदल आणि तरुण वयातील ह्रदयविकाराची कारणे व उपाय जाणून घ्या डाॅक्टरांकडून! 

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.