AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर

टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते.

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर
टीबीची लक्षणे, उपचार पध्दत आणि नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, जाणून घ्या. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 10:34 AM
Share

मुंबई : टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते. टीबीची सुरूवातीची लक्षणे (Symptoms) लोकांना समजण्यास उशीर होतो. बर्‍याच वेळा लोक टीबीच्या लक्षणांना सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात, अशावेळी हा आजार गंभीर स्थितीत पोहोचतो आणि काही वेळा तो प्राणघातक ठरतो.

टीबी होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे, धुम्रपान किंवा जास्त प्रमाणात मद्यपान, संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे, लहान मुले, वृद्ध, गरोदर स्त्रिया, किडनीचे आजार, मधुमेह किंवा इतर जुनाट आजारांनी ग्रस्त लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते. ज्यामुळे त्यांना या आजाराचा धोका वाढतो. याशिवाय ज्या लोकांचे अवयव प्रत्यारोपण, कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी झाली आहे, असे लोकही टीबीच्या बाबतीत हाय रिस्क झोनमध्ये येतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, धाप लागणे, भूक न लागणे किंवा कमी होणे, थकवा किंवा अशक्तपणा, वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, कधीकधी श्लेष्मामध्ये रक्त येणे. आजच्या काळात हा आजार वाढतच जात आहे. त्यासाठी लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. एकदा क्षयरोगाची पुष्टी झाल्यानंतर, विशेषज्ञ सहा ते नऊ महिन्यांचा कोर्स करून त्यावर उपचार करतात. जर क्षयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले असेल, तर हा उपचार 18 ते 24 महिन्यांपर्यंत चालू शकतो. परंतु उपचारात अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

उपचार नेमका कसा केला जातो! 

टीबीवर उपचार सुरू असताना औषधांमध्ये अंतर येऊ देऊ नका. अन्यथा उपचार पुन्हा सुरू करावे लागतील. त्यामुळे या बाबतीत तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा. टीबीची लागण झालेल्या लोकांपासून योग्य अंतर ठेवा. स्वच्छतेची काळजी घ्या. कोणाशीही बोलत असताना नाक-तोंडावर कपडा ठेवा. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे टीबी असलेल्या रूग्णांने नेहमीच इतरांना बोलताना किंवा घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रूमाल बांधावा.

(टीप : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही आजारतात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आजारवर उपचार सुरू करा.)

संबंधित बातम्या : 

लहान मुले सतत आजारी पडतायेत? मग मुलांपासून आजार दूर ठेवण्यासाठी डाॅक्टरांच्या या खास टिप्स फाॅलो आणि मुलांना निरोगी ठेवा!

World TB Day : 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?