AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Supreme Court Hearing : ‘फक्त विधिमंडळ पक्षातच नाही, तर राजकीय..’ कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे शिवसेनेकडून तितकच कडक उत्तर

Shivsena Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. ते त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shivsena Supreme Court Hearing : 'फक्त विधिमंडळ पक्षातच नाही, तर राजकीय..' कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे शिवसेनेकडून तितकच कडक उत्तर
Eknath Shinde-Uddhav Thackeray
| Updated on: Aug 12, 2026 | 6:04 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. “ते त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.  आमचा युक्तीवाद सुरु होईल, तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या किंवा नाही झाल्या हे सगळ्या जगाला माहित आहे. निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरु आहे. हा कोर्टाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. मी पुन्हा, पुन्हा तेच सांगू इच्छितो की, शिवसेना पक्ष, पदाधिकार, आमदार, नगरसेवक हे मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विजय आमचा होणार” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.

“त्यांच्याकडे इतर मुद्दे नसल्यामुळे निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरु आहे. पहिल्यादिवसापासून विधिमंडळ पक्षात फूट पडली. पण राजकीय पक्षात फूट पडली नाही असा जोरदार युक्तीवाद सुरु आहे. विधिमंडळ पक्षात त्यांच्याकडे बहुमत नव्हतं हे सिद्ध झालेलं आहे. राजकीय पक्ष संघटनेत 90 टक्क्यांच्या वर जिल्हाप्रमुख, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. विधिमंडळ पक्षात फूट पडली असं नाहीय. 90 टक्क्यांच्यावर पक्ष संघटना शिंदेसाहेबांसोबत आहे. जिल्हापरिषदा, महापालिका त्या ठिकाणी आमचे जे लोक निवडून आले, कार्यकर्ते संघटनेसोबत आहेत म्हणून निवडून आले” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.

बाळासाहेबांच्या भूमिकेपासून लांब गेलेलो नाही

“कपिल सिब्बल बोलत असताना यूबीटीचे सध्याचे शिल्लक खासदार आहेत, त्यांच्या भावना निर्माण होत आहेत. आम्ही जिंकू अशा भावना निर्माण होण्याकरता सिब्बल बोलतायत. आमचे वकिल बोलायला लागले की तुम्हाला आमची बाजू समजेल” असं नरेश म्हस्के म्हणाले. “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. निर्णय देणारी संस्था आहे. अशा पद्धतीने टीका करणं योग्य वाटत नाही. राजकीय पक्ष म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेपासून लांब गेलेलो नाही” असं नरेश म्हस्के म्हणाले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...