AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scam 2010: ‘स्कॅम 2010’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; साकारणार सुब्रत रॉय यांची भूमिका

Scam 2010: हंसल मेहता यांच्या 'स्कॅम 2010' या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या अभिनेत्याने आजवर दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 4:21 PM
Share
दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या 'स्कॅम' फ्रँचाइजीमधील नव्या वेब सीरिजचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'स्कॅम 2010' असं या सीरिजचं नाव असून ही दिवंगत उद्योगपती आणि सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर आधारित आहे. तमाल बंदोपाध्याय यांच्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे.

1 / 5
या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका एक मराठमोळा अभिनेता साकारत आहे. या पोस्टरमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धार्थ बोडके आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले', 'दृश्यम', 'देवमाणूस' यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ आता या हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

2 / 5
 एका साम्राज्याच्या उदयाची आणि त्याला अजिंक्य समजणाऱ्या माणसाची रंजक कथा यात पहायला मिळणार आहे. सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री तितिक्षा तावडेनंही हा पोस्टर शेअर करत 'let's go' असं लिहिलं आहे. हंसल मेहता यांनी याआधी 'स्कॅम 1992' आणि 'स्कॅम 2003' हे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते.

3 / 5
या सीरिजबद्दल सिद्धार्थ म्हणाला, "यातील मुख्य पात्राच्या व्यक्तिमत्त्वाची गुंतागुंत आणि सीरिजचा आवाका पाहून मी थक्क झालो. जिद्द, शक्ती, उणिवा आणि पतन यांमुळे हे पात्र साकारण्याचा अनुभव खूपच रोमांचक होता." सिद्धार्थला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

4 / 5
सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवार या उद्योगसमूहाची सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारल्याबद्दल सेबीने त्यांची चौकशी केली. त्यानंतर हा खटला देशभरात चर्चेत आला. 2014 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या समस्यांशी झुंज देताना सुब्रत रॉय यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये निधन झालं.

5 / 5
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं

ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...