AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi यांचं आवाहन आणि अंबानी कुटुंबाने घेतला हा मोठा निर्णय

Ambani Family : अंबानी कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत येणारं कुटुंब आहे. सध्या अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कारण मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी जगभरातील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.

PM Narendra Modi यांचं आवाहन आणि अंबानी कुटुंबाने घेतला हा मोठा निर्णय
| Updated on: Feb 29, 2024 | 7:05 PM
Share

जामनगर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट सोबत होणार आहे. लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. जगभरातील व्हीव्हीआयपी लोकं या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. 1 ते 3 मार्च दरम्यान जगभरातून पाहुणे या लग्नाला येणार आहेत. या लग्नसोहळ्याला रिहाना आणि जादूगार डेव्हिड ब्लेन यांच्यासह प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार देखील आपली कला दाखवणार आहेत. अव्वल भारतीय संगीतकार अरिजित सिंग, अजय-अतुल आणि दिलजीत दोसांझ हे देखील गाण्यांचं सादरीकरण करणार आहे. भारतातील व्हीव्हीआयपी पाहुणे ज्यामध्ये जागतिक बिझनेसमन आणि टेक्नॉलॉजी आयकॉन्स यांचा ही समावेश आहे.

कोणाकोणाला आमंत्रण?

भारतातून कुमार मंगलम बिर्ला, उदय कोटक, आदर पूनावाला, सुनील मित्तल, आध्यात्मिक संत सद्गुरू, सचिन तेंडुलकर, एम.एस धोनी, रोहित शर्मा, केएल राहुल, अमिताभ बच्चन, रजनीकांत या स्टार्सना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.  याशिवाय शाहरुख खान, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, विकी कौशल आणि कतरिना कैफ तसेच माधुरी दीक्षित यांना ही आमंत्रण देण्यात आले आहे.

अंबानी कुटुंबाने लग्नासाठी का केली जामनगरची निवड ?

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनंत अंबानी यांनी सांगितले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वेड इन इंडिया’ आवाहनानंतर घेण्यात आलाय. याशिवाय त्यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला आणि आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांचा व्यवसायही तेथून सुरू झालाय. अनंत अंबानी म्हणाले की, ‘मी येथे मोठा झालो आहे आणि हे माझे नशीब आहे की आम्ही येथे सेलिब्रेशनचे करु शकत आहोत. हे माझ्या आजीचे जन्मस्थान आणि माझ्या आजोबा आणि वडिलांचे कार्यस्थान आहे. भारतात प्रत्येकाने लग्न केले पाहिजे आणि हे माझे घर आहे असे आपले पंतप्रधान म्हणाले तेव्हा ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

अनंत अंबानी यांनी सांगितले की, ‘माझे वडील अनेकदा सांगतात की, हे माझ्या आजोबांचे सासरचे घर आहे आणि त्यामुळेच आम्ही येथे उत्सव साजरा करत आहोत. मी जामनगरचा आहे, मी या ठिकाणचा नागरिक आहे, असा माझा विश्वास आहे.’ तीन दिवसीय महोत्सवासाठी सर्व पाहुणे 1 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत मुंबई किंवा दिल्लीहून चार्टर्ड फ्लाइटने जामनगरला पोहोचणार आहेत.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.