मोठी बातमी! जगभरात मोठी खळबळ; कोणत्याही क्षणी होणार भीषण युद्धाला सुरुवात? चीन, रशियाची जहाजं रवाना, आता थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून, आता इराणच्या मदतीला चीन आणि रशिया धावून आले आहेत, चीन आणि रशियाकडून जहाजं रवाना करण्यात आली आहे.

मोठी बातमी! जगभरात मोठी खळबळ; कोणत्याही क्षणी होणार भीषण युद्धाला सुरुवात? चीन, रशियाची जहाजं रवाना, आता थेट...
China, Russia
| Updated on: Feb 19, 2026 | 5:48 PM

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढतच चालला आहे, अमेरिका इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते अशी सध्या स्थिती आहे. दुसरीकडे इराणमध्ये देखील सैन्य हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेने यापूर्वीच आपल्या दोन विमानवाहू युद्ध नौका मध्य पूर्वेमध्ये तैनात केल्या आहेत. त्यामुळे आता मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जर अमेरिकेनं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ अशी धमकी इराणने दिली आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असतानाच आता दुसरीकडे चीन आणि रशिया इराणच्या मदतीला धावून आले आहेत, रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. रशिया चीन आणि इराणन मॅरिटाइम सिक्योरिटी बेल्ट 2026 अंतर्गत संयुक्त युद्ध सरावासाठी आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत.

मात्र हा जरी युद्धसराव वाटत असला तरी देखील हा अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. कारण हा युद्ध सराव या आठवड्याच्या शेवटी होणार आहे, मात्र असं असताना देखील त्यापूर्वीच रशियाची जहाजं अब्बास बंदरावर पोहोचली आहेत, युद्ध रणनीतीसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. चीन, रशिया आणि इराण हे तीन्ही देश ओमानच्या खाडीमध्ये आणि उत्तर हिंद महासागरात युद्धसराव करणार आहेत, मात्र युद्ध सरावापूर्वीच ही जहाजं इराणच्या अब्बास बंदरात दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

दुसरीकडे रशियाकडून इराणच्या मुद्द्यावर अमेरिकेला थेट इशारा देखील देण्यात आला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेला उद्देशून मोठं विधान केलं आहे. जर तुम्ही इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा थेट इशारा सर्गेई यांनी दिला आहे. सौदी अरेबियाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, यापूर्वी देखील अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. आता आणखी युद्ध नको अशीच मध्य पूर्वेमधील देशांची इच्छा आहे. इराणसोबत युद्ध म्हणजे आगीसोबत खेळल्यासारखं आहे, इराणला देखील एनपीटी अंतर्गत शांततापूर्ण परिस्थितीमध्ये आण्विक धोरणाचा अधिकार आहे, चर्चेद्वारे यातून मार्ग काढला जाऊ शकतो. दरम्यान दुसरीकडे चीनने देखील रशियाच्या या धोरणाला पाठिंबा दिला आहे, एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये चीनचं जहाज देखील इराणच्या बंदरात पोहोचल्याचं दिसून येत आहे.