
रशियाकडून तेल खरेदीच कारण देत अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली, तर टॅरिफ लावू अशी धमकी अमेरिकेने दिली आहे. अतिरिक्त टॅरिफ लावण्याबद्दल सध्या अमेरिकेकडून कुठलही स्टेटमेंट आलेलं नाही. पण रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्यावर भारतीय तेल कंपनी इंडियन ऑईलच स्टेटमेंट आलं आहे. चालू तिमाहीत रशियाकडून तेल खरेदी सुरु राहील असं IOCL ने म्हटलं आहे. जिथून स्वस्तात तेल मिळेल तिथून आम्ही विकत घेणार असं IOCL ने म्हटलं आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफचा धोका असताना IOCL कडून हे स्टेटमेंट आलं आहे.
वॉशिंग्टनने भारतावर आधीच 25 टक्के टॅरिफ आकारला आहे. हा टॅरिफ सुरु असताना, रशियाकडून तेल खरेदीसाठी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. हा अतिरिक्त टॅरिफ येत्या 27 ऑगस्टपासून आकारला जाईल. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत IOCL ने एकूण आयात केलेल्या तेलापैकी रशियाचा वाटा 24 टक्के आहे. 2025 मध्ये हेच प्रमाण 22 टक्के होतं.
आतापर्यंत रशियाकडून किती तेल आयात केलय?
कंपनीने एक विश्लेषक कॉल दरम्यान सांगितलं की, आम्ही आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रशियन कच्चा तेलाच्या आयातीचा वाटा 22 टक्के होता. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत हा वाटा 24 टक्के आहे. या तिमाहीत फायनान्शिअल स्थितीच्या आधारावर आम्ही रशियन कच्चा तेलाची खरेदी सुरु ठेऊ.
IOCL चा प्लान काय?
IOCL ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 34 हजार कोटींच कॅपिटल एक्सपेंडिचर प्लान बनवला आहे. यात 14,000-15,000 कोटी रिफायनरी ऑपरेशन्ससाठी आहेत. 15,000-16,000 कोटी रुपये पेट्रोकेमिकल्स, मार्केटिंग, पाइपलाइन्स आणि सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनसाठी खर्च होतील. कंपनीने अनेक प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून रिफायनिंग कॅपेसिटी सुद्धा वाढवली आहे. पानीपत रिफायनरीची प्रति वर्षाची 15 मिलियन मेट्रिक टनची कॅपेसिटी वाढवून 25 MMTPA करण्याच काम या वर्षाच्या अखेरीस सुरु होईल. गुजरातच्या कोयली रिफायनरीची कॅपेसिटी 13.7 MMTPA ने वाढवून 18 MMTPA केली जाईल.
प्रोजेक्ट कॉस्ट वाढवली
बिहारच्या बरौनी रिफायनरीचा विस्तार, त्याची 6 MMTPA कॅपेसिटी वाढवून 9 MMTPA करण्यात येईल. ऑगस्ट 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल. बोर्डाने अलीकडेच प्लांट आणि मशीनरीच्या वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रोजेक्ट कॉस्ट 13,779 कोटी रुपयांनी वाढवून 16,724 कोटी रुपयाला मंजुरी दिली.