‘नेहरुंच्या काळात झालेल्या 2 चुकांमुळे काश्मीरला खूप भोगावं लागलं’, अमित शाह यांचा गंभीर आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख करत मोठा दावा केला. नेहरु देशाचे पंतप्रधान असताना दोन चुकीचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे काश्मीरला अनेक वर्ष भोगावं लागलं, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी विरोधकांनी आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या आक्षेपवर उत्तर देताना अमित शाह यांनी पुरावा म्हणून नेहरुंनी लिहिलेलं एक पत्र वाचून दाखवलं.

'नेहरुंच्या काळात झालेल्या 2 चुकांमुळे काश्मीरला खूप भोगावं लागलं', अमित शाह यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 8:29 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 6 नोव्हेंबर 2023 : केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्यो कोणती विकासकामे केली? असा सवाल विरोधकांनी आज लोकसभेत केला. त्यांच्या या सवालावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत टीका केली. अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. याचवेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात झालेल्या 2 चुकांमुळे काश्मीरला पुढचे अनेक वर्ष अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

“नेहरुंच्या काळात ज्या चुका झाल्या त्यामुळे काश्मीरला भोगावं लागलं. मी या सभागृहात उभा राहून जबाबदारीने सांगतो पंडित जवाहरलाल यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या चुका झाल्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे या दोन चुका झाल्या. त्यामुळे अनेक वर्ष काश्मीरला सहन करावं लागलं. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपलं सैन्य जिंकत होतं, पंजाबचा भाग येताच सीजफायर केलं गेलं. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. सीजफायर तीन दिवस उशिरा झालं असतं तर पाकव्याप्त काश्मीर भारतात असतं. दुसरी चूक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये घेऊन गेले”, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी नेहरुंचं पत्र वाचून दाखवलं

यावेळी अमित शाह यांनी पंडित जवाहरलाल यांच्या एका पत्राचा दाखला दिला. त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं. “मी एक पत्र लिहू इच्छितो, यूनायटेड नेशनच्या अनुभवानंतर मी एका निष्कर्षावर पोहोचलो आहे की, तिथून कुठल्याही समाधानाची आशा केली जाऊ शकत नाही. मला शस्त्रसंधीचं उल्लंघन हा चांगला निर्णय वाटला. पण या प्रश्नाला योग्य पद्धतीने सोडवलं गेलं नाही. आपण सीजफायरवर आणखी विचार करुन काही चांगला मार्ग काढू शकलो असतो. मला वाटतं की, भूतकाळात आपल्याकडून ही एक चूक आहे”, असं पत्र अमित शाह यांनी वाचून दाखवलं.”नेहरु मेमोरियल म्युजियम अँड लॅबररी जवारलाल नेहरु कलेक्शन JNSG 142 पानावर जवाहरलाल नेहरु यांचं शेख अब्दुल्ला यांना पाठवलेलं पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी आपली ती चूक होती”, असं जवाहरलाल नेहरु पत्रात म्हणत असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.

विरोधकांचा सभागृहात गोंधळ

यावेळी विरोधकांनी जोरदार निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर अमित शाह यांनी “मी नेहरुंचं पत्र वाचत आहे, माझ्यावर का रागावत आहात? रागवायचं असेल तर नेहरुजींवर रागवा. हे त्यांचे विधान आहे. ते माझ्यावर रागावत आहेत. मी जे वाचलं ते स्वत: जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलं आहे”, असं म्हटलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.