‘पाकव्याप्त काश्मीर भारताचं, तिथल्या 24 विधानसभेच्या जागा आरक्षित’, अमित शाह यांचं संसदेत मोठं वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढवण्यात आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील 24 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, कारण तो भाग आपलाच आहे, असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.

'पाकव्याप्त काश्मीर भारताचं, तिथल्या 24 विधानसभेच्या जागा आरक्षित', अमित शाह यांचं संसदेत मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 7:42 PM

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठनबाबतच्या विधेयकावर चर्चा सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत महत्त्वाचं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे तिथल्या 24 विधानसभेच्या जागा आम्ही आरक्षित ठेवल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे. कारण पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जातात. दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या नऊ वर्षात अतिरेकी कारवाईच्या घटनांमध्ये किती टक्के घट झाली, या विषयी सविस्तर माहिती दिली. यासाठी त्यांनी 1994 पासूनच्या घटनांचे दाखले दिले.

“अनेक सदस्यांनी जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. अर्थात त्याबाबत सर्वांना चिंता वाटायला हवं. त्यांनी या घटनांचा थेट संबंध जम्मू-काश्मीरच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाशी जोडला. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवान शहीद झाले. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आतंकवाद संपेल, असं कुणीच म्हटलं नव्हतं. कलम 370 हटवल्याने अलवादमध्ये खूप कमतरता येतील. त्यामुळे अतंकवादच्या घटना कमी होतील, असं मी म्हटलं होतं. 1994 ते 2004 या कालखंडात 40 हजार 164 आतंकवादच्या घटना घडल्या आहेत. 2004 ते 2014 या दहा वर्षात 7 हजार 217 आतंकवादच्या घटना घडल्या. मोदी सरकारच्या 2014 ते 2023 कालखंडात 2000 घटना घडल्या. या घटना 70 टक्क्याने घटल्या”, असा दावा अमित शाह यांनी केला.

“यापैकी 65 टक्के घटना या पोलिसांनी केलेल्या कारवाईने झाल्या आहेत. याचा अर्थ असा की पोलिसांनी अतिरेक्यांच्या लपल्याची टीप मिळाली, पोलीस घटनास्थळी जातात, शोध घेतात, यावेळी दोन्ही बाजूने गोळीबारच्या घटना घडतात, या घटनेलादेखील आतंकवादची घटना म्हणून मानली जाते. गेल्या 9 वर्षात दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये नागरीकांच्या मृत्यूच्या घटना 70 टक्क्यांनी घडल्या, तर जवानांच्या मृत्यूच्या घटना 59 टक्क्यांनी घटल्या आहेत. अल्गावादचं मूळ, त्याचं उगमस्थान कलम 370 मधून आलेलं आहे. ते जणार, अलगावादची भावनाही जाईल आणि अतिरेकी हल्ल्याच्या घटनांमध्येही घट होईल. झिरो टेरर प्लॅन आखला आहे. 2024 ला पुन्हा मोदी सरकार येईल. त्यानंतर झिरोर टेरर प्लॅन 2026 पर्यंत पूर्ण होईल”, असं अमित शाह म्हणाले.

‘पाकव्याप्त काश्मीरच्या 24 जागा आम्ही आरक्षित ठेवल्यात’

“जम्मूमध्ये आधी 37 जागा होत्या, पण न्यायचा विषय आहे, त्यामुळे जम्मूत विधानसभेच्या 45 जागा झाल्या आहेत. काश्मीरमध्ये आधी 46 जागा होत्या, आता 47 जागा झाल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या 24 जागा आम्ही आरक्षित ठेवल्या आहेत. कारण पाकव्याप्त काश्मीर आपला आहे”, असं अमित शाह म्हणाले. “जम्मू-काश्मीरमध्ये आधी 107 विधानसभेच्या जागा होत्या, आता 114 जागा झाल्या आहेत. याआधी 2 नामनिर्देशित सदस्य असायचे, आता 5 नामनिर्देशित सदस्य असतील. जम्मू-काश्मीरच्या कायद्यानुसार, राज्यपालांकडून दोन महिलांना नामनिर्देशित केलं जातं. यामध्ये एक महिला काश्मीरमधून तर दुसरी महिला पाकव्याप्त काश्मीरमधील असेल”, असं अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या
बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदत कुणाची नाही; भररस्त्यात तरुणीची हत्या.
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर.
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर...
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर....
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.