Operation Sindoor बद्दल अमिताभ बच्चन यांना माहिती होतं? ‘त्या’ ट्विटनंतर चर्चांना उधाण

Operation Sindoor: ऑपरेश सिंदूर पूर्ण होण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी केलेलं असं ट्विट, 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण, सध्या सर्वत्र महानायक अमिताभ बच्चन आणि ऑपरेश सिंदूरची चर्चा...

Operation Sindoor बद्दल अमिताभ बच्चन यांना माहिती होतं? त्या ट्विटनंतर चर्चांना उधाण
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 07, 2025 | 10:21 AM

Operation Sindoor: 22 एप्रिल मध्ये जम्मू – काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना हिंदू आणि मुस्लीम विचारत हिंदू पर्यटकांवर गोळीबार करत 26 जणांना मारलं. ज्याचा आता भारताने बदला घेतला आहे. या स्ट्राइकला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहेत. अशात महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलंय, पण बिग बींनी ब्लँक ट्विट केलं आहे. सांगायचं झालं तर, पहलगाम हल्ल्यानंतर बिग बींनी  16 ब्लँक ट्विट केले आहेत.

भारताने पाकिस्तान आणि PoK येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहे. या हल्ल्यात दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेश सिंदूर होण्याच्या 5 तासांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं. “T 5359 –” असं ब्लँक ट्विट बिग बी यांनी केलं. हे ट्विट देखील ब्लँक असल्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. काही नेटकरी म्हणाले, ‘तुमचं पुढचं ट्विट हे जय हिंद असायला हवं…’

 

 

22 एप्रिल रोजी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं. ट्विट करत बिग बी म्हणाले, द सायलेंट एक्स क्रोमोसोम. त्यानंतर, 23 आणि 24 एप्रिल रोजी बिग बींनी ब्लँक ट्विट केलं. मात्र हल्ल्याच्या 5 तासांपूर्वी बिग बी यांनी पुन्हा ‘ब्लँक ट्विट’ केलं. ज्यामुळे बिग ही यांना हल्ल्याबद्दल पूर्वीच माहिती होतं का? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ भारतीय जवानांसाठी हा सिग्नल होता.’, अनेक नेटकरी म्हणाले, ‘बिग बींचं पुढील ट्विट आता जय हिंद असेल..’ अनेकांनी बिग बींना ऑपरेशन सिंदूरवर काही बोलण्यासाठी सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि ऑपरेशन सिंदूरची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ते प्रत्येक मुद्द्यावर स्वतःचं मत उघडपणे व्यक्त करतात. त्यांचे X वर 49 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.