Operation Sindoor: मध्यरात्री आमच्यावर हल्ला आणि…, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी मीडियाची प्रतिक्रिया
Operation Sindoor: पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाला की, भारताने मध्यरात्री कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले.

Operation Sindoor: पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. याचदरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर एयरस्ट्राइक केलं. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मीडिया यावर प्रतिक्रिया देत आहे.
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाला की, भारताने मध्यरात्री कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले.
डीजी चौधरी मध्यरात्री 1.06 वाजता ARY News ला म्हणाला, ‘भ्याड शत्रू भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी हवाई हल्ले केले – सुभानल्लाह मशीद, कोटली कोटली आणि मुझफ्फराबाद याठिकाणी हल्ले केले आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्कान देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी याचं उत्तर देईल. घृणास्पद चिथावणीला लवकरच उत्तर देण्यात येईल…’
पाकिस्तानी वृत्तसंस्था जिओ न्यूजने ऑपरेशन सिंदूरला भारताची आक्रमक आणि चिथावणीखोर कारवाई म्हणून सांगितलं आहे. ‘भारताने तीन ठिकाणी मिसाईल हल्ले केले आहे आणि पाकिस्तान याचं उत्तर देईल…’
पाकिस्तानच्या सरकारी प्रसारक पीटीव्ही न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने केलेल्या हल्ल्यात एका निर्दोष मुलगा शहीद झाला असून एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी आहे. भारताने मध्यरात्री निर्दोष पाकिस्तानी नागरिकांवर भ्याड हल्ला केला.
सुरक्षा मंत्री ख्वाजा आसिफ याने ARY News सांगितलं, निवासी भागांवर हल्ले झाले आहेत. भारताने त्यांच्या हवाई हद्दीतून हल्ला केला आहे. त्यांनी त्यांच्या सीमेवरून हल्ला केला. त्यांना बाहेर येऊ द्या, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.
काही वाहिन्यांनी भारताचे हल्ले मर्यादित असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तान याचं योग्य वेळी प्रत्युत्तर देईल असं देखील म्हटलं आहे. सांगायचं झालं तर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 17 जण गंभीर जखमी झाली.
हल्ला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात करण्यात आला, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी निवडकपणे लोकांना लक्ष्य केले. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांनी धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला.
