Andhra Pradesh | ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने रुग्णालयात गोंधळ, 11 जणांचा मृत्यू

| Updated on: May 11, 2021 | 10:13 AM

ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen Supply) विस्कळीत झाल्याने एका सरकारी रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. (Andhra Pradesh Ruia Govt Hospital oxygen supply)

Andhra Pradesh | ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने रुग्णालयात गोंधळ, 11 जणांचा मृत्यू
Follow us on

हैदराबाद : ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen Supply) विस्कळीत झाल्याने एका सरकारी रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात (Ruia Govt Hospital) ही घटना घडली. या दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिले. (Andhra Pradesh Ruia Govt Hospital Patient Died Due to reduction in pressure of oxygen supply)

या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. भारती यांच्यानुसार 12 जणांचा मृत्यू (Death झाला आहे. यात कोरोनाच्या 9 रुग्ण, तर कोरोनाबाधित नसलेले 3 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर अद्याप 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात सोमवारी रात्री 8 ते 8,30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतील चेन्नईहून ऑक्सिजन टँकर तिरुपतीच्या दिशेने रवाना झाला. पण हा ऑक्सिजन टँकर वेळेत पोहोचू शकला नाही. त्या टँकरला येण्यास 5 मिनिटे उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. या रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

तिरुपतीच्या या रुग्णालयात 100 रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णांना त्रास होऊ लागला. यामुळे अचानक रुग्णालयात धावपळ सुरु झाली. दरम्यान सध्या या ठिकाणी ऑक्सिजन टँकर दाखल झाला असून परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली आहे, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त 

तिरुपतीमधील रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खरबदारी घेण्याचे निर्देशही रेड्डी यांनी दिले आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतोय की नाही याची वेळोवेळी खबरदारी घेण्यात यावी. तसंच तज्ज्ञांकडून तंत्रज्ञांची माहिती करून घ्यावी. रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष द्यावं. ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा सुरूच आहे. त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले. (Andhra Pradesh Ruia Govt Hospital Patient Died Due to reduction in pressure of oxygen supply)

संबंधित बातम्या : 

Nashik Oxygen Leakage : नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे, मुदतीपूर्वीच चौकशी समितीचा अहवाल सादर

VIDEO: नाशिकला दत्तक घेतो, शहराचा चेहरामोहराच बदलून टाकेन; फडणवीसांच्या ‘त्या’ आवेशपूर्ण भाषणावरुन काँग्रेसचा खोचक टोला