VIDEO: नाशिकला दत्तक घेतो, शहराचा चेहरामोहराच बदलून टाकेन; फडणवीसांच्या ‘त्या’ आवेशपूर्ण भाषणावरुन काँग्रेसचा खोचक टोला

VIDEO: नाशिकला दत्तक घेतो, शहराचा चेहरामोहराच बदलून टाकेन; फडणवीसांच्या 'त्या' आवेशपूर्ण भाषणावरुन काँग्रेसचा खोचक टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता

या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी मी नाशिकला दत्तक घेत असून या शहराचा चेहरामोहरा बदलेन, अशी गर्जना केली होती. | Nashik Devendra Fadnavis congress

Rohit Dhamnaskar

|

Apr 22, 2021 | 1:21 PM

मुंबई: नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणुकीच्यावेळी नाशिकमध्ये केलेल्या एका आवेशपूर्ण भाषणाचा व्हीडिओ ट्विट केला आहे. (Congress take a dig at Devendra Fadnavis after 22 people died in Nashik due to Oxygen tanker leaked)

या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी मी नाशिकला दत्तक घेत असून या शहराचा चेहरामोहरा बदलेन, अशी गर्जना केली होती. हाच धागा पकडत काँग्रेसने खोचक शेरेबाजी केली आहे. एकदा पालकत्व घेतल्यानंतर ते असं मध्येच सोडायचं नसतं, देवेंद्र फडणवीस साहेब, अशी कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 22 जणांचा मृत्यू

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या:

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल

Nashik Oxygen leakage : ‘नाशिकच्या दुर्घटनेला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत, आता तरी जागे व्हा’, दरेकरांचा संताप

नाशिकच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक, छात्रभारतीकडून निलंबनाची मागणी

(Congress take a dig at Devendra Fadnavis after 22 people died in Nashik due to Oxygen tanker leaked)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें