Nashik Oxygen leakage : ‘नाशिकच्या दुर्घटनेला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत, आता तरी जागे व्हा’, दरेकरांचा संताप

प्रवीण दरेकर संध्याकाळी झाकिर हुसेन रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

Nashik Oxygen leakage : 'नाशिकच्या दुर्घटनेला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत, आता तरी जागे व्हा', दरेकरांचा संताप
नाशिक दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर यांची राज्य सरकारवर टीका
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 7:33 PM

नाशिक : नाशिकमधील महापालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात प्राणवायूची गळती झाली आणि ऑक्सिजन अभावी 24 निष्पाप जीव गेले. नाशिकमधील या दुर्घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी घडलेल्या या घटनेनंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर संध्याकाळी झाकिर हुसेन रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. (Thackeray government’s negligence responsible for Nashik tragedy, Allegation of Praveen Darekar)

“मला राजकारण किंवा कुणावर आरोप-प्रत्यारोप करायचा नाही. पण हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो की, रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवा, काळजी घ्या. तज्ज्ञांची नियुक्ती करायला हवी होती. वेळीच काळजी घेतली असती तर हा प्रकार घडला नसता”, अशा शब्दात दरेकर यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलंय. यावेळी दरेकर यांनी राज्य सरकारला दोन महत्वाच्या सूचनाही केल्यात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कल्पना मांडल्याप्रमाणे विमानाने ऑक्सिजन आणावा. जेणेकरुन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लागणारा वेळ टाळता येईल. त्याचबरोबर रेमडेसिव्हीरबाबत युद्धपातळीवर निर्णय घ्यावा. त्यासाठी लागेल ती मदत आम्ही करु, असं आवाहनही दरेकर यांनी सरकारला केलंय.

नाशिकच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

प्रविण दरेकर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करत निलंबन करण्याची मागणी केलीय. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आयुक्तांचं तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले, “नाशिकमध्ये घडलेली घटना ह्रद्य हेलावणारी आणि व्यथित करणारी आहे. या घटनेत स्वाभाविकपणे हलगर्जीपणा सरकारचाच आहे. महापालिका असो की जिल्हा ते सरकारच्या नियंत्रणात काम करत असते. या साथीरोगात महापालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आयुक्तांची आहे. कारण अशाकाळात महापालिकांना किंवा जिल्हा परिषदांना अधिकार नसतात. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात. या खात्याचं नियंत्रण करणारी लोकं आणि सरकार यांची ही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं नियोजनच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर असतं. म्हणूनच याला सरकार जबाबदार आहे आणि आयुक्त दोषी आहेत.”

मृतांची संख्या 24 वर

नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा होऊ न शकल्यानं दुपारी 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर संध्याकाळी मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत

नाशिकमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच या दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नाशिक महापालिकेकडूनही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू

Thackeray government’s negligence responsible for Nashik tragedy, Allegation of Praveen Darekar

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.