Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा, पंतप्रधान मोदी यांनी दिली…

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी १९९७ मध्ये लाल किल्ल्यावरून प्राथमिक शिक्षण मूलभूत अधिकार बनवण्याची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या विरोधार नारा दिला.

Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा, पंतप्रधान मोदी यांनी दिली...
| Updated on: Aug 13, 2023 | 9:00 PM

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान सरकारच्या जमेच्या बाजू तसेच आव्हानांसंदर्भात घोषणा करतात. प्रत्येक पंतप्रधान आपल्या पद्धतीने घोषणा करतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. १५ ऑगस्टला मोदी कोणत्या घोषणा करतात, हे पाहावं लागेल. सर्व पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर पोहचून गरिबी मिटवण्याची घोषणा केली. शहिदांची आठवण केली. पंचायत राजची देण ही राजीव गांधी यांची आहे. डिजीटल इंडियासाठीही राजीव गांधी यांनी सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वेळा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. सुरुवातीला ते विकासकामांबद्दल बोलत होते. पुढील २५ वर्षांत भारत कसा असेल,याची घोषणा त्यांनी केली.

कौशल्य विकास

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सामान्य व्यक्ती आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या घोषणा दिल्या. २००८ मध्ये त्यांनी लाल किल्ल्यावरून कौशल्य विकास मिशनची घोषणा केली. २०१२ मध्ये सिंग यांनी कौशल्य विकास प्राधिकरणाची घोषणा केली.

भ्रष्टाचाराविरोधात नारा

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी १९९७ मध्ये लाल किल्ल्यावरून प्राथमिक शिक्षण मूलभूत अधिकार बनवण्याची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या विरोधार नारा दिला.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी १९९६ मध्ये लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. स्वतःला त्यांनी शेतकरी समजून घोषणा केल्या. उत्तराखंड राज्याला नव्या राज्याचा दर्ज दिला. गहू-तांदुळ देण्याव्यतिरिक्त काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली. पीव्ही नरसिंहराव यांनी भाषणातून पाकिस्तानला इशारा दिला. गरिबी निर्मुलन, पायाभूत सुविधा मजबूत करण्याची घोषणा केली.

१९९८ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. अल्पसंख्यकांच्या सुरक्षेचा वादा केला. २००३ मध्ये चंद्रयान अंतराळात पाठवण्याची घोषणा केली.