मोठी बातमी! भारताला आणखी एक जबर धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, चिंता वाढली

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा भारताला देखील फटका बसला आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारातून आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

मोठी बातमी! भारताला आणखी एक जबर धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, चिंता वाढली
crude oil
| Updated on: Mar 13, 2026 | 8:34 PM

इस्त्रायल अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 14 दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराण माघार घेण्यास तयार नाही. इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर जोरदार मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मूज स्ट्रेट बंद झाल्यानं जगभरातील अनेक देशांची मोठी कोंडी झाली आहे. प्रचंड प्रमाणात इंधन टंचाई जाणवत आहे. कारण जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक ही एकट्या होर्मूजच्या सामुद्रधुनीमधून होते. याचा फटका हा भारताला देखील बसला आहे. देशात आता इंधन टंचाई जाणवू लागली आहे.

दरम्यान या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे इंधन संकट निर्माण झालं आहे. भारतासमोर इंधन टंचाईचं संकट असतानाच आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे रुपयामध्ये घसरण सुरूच आहे. गुरुवारी रुपयाचं मूल्य प्रति डॉलरच्या तुलनेत 92.35 रुपयांवर पोहोचलं होतं, त्यानंतर थोडी सुधारणा पहायला मिळाली. मात्र रुपयांच्या मुल्यामध्ये होणाऱ्या घसरणीने आता भारताची चिंता वाढवली आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत, कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर डॉलर मजबूत होतो, त्यामुळे रुपयाचं मूल्य आता आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारत मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून गॅस आणि कच्च्या तेलाची आयात करतो, मात्र युद्धामुळे इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत, याचा मोठा दबाव सध्या रुपयावर दिसून येत आहे. रुपयामध्ये घसरण सुरू असून, याचा परिणाम हा परकीय चलन साठ्यावर देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे दर जर दीर्घ काळापर्यंत प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा अधिक राहिले तर याचा मोठा फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

 

Follow Us