AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही वयाच्या 72व्या वर्षी मोदींसारखं ॲक्टिव्ह राहू शकता; फक्त या गोष्टी करा

या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याहीवेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खा.

तुम्हीही वयाच्या 72व्या वर्षी मोदींसारखं ॲक्टिव्ह राहू शकता; फक्त या गोष्टी करा
तुम्हीही वयाच्या 70व्या वर्षी मोदींसारखं ॲक्टिव्ह राहू शकता; फक्त या गोष्टी कराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2022 | 4:16 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज आपला 72 वा वाढदिवस (birth day) साजरा करत आहेत. वयाच्या 70व्या वर्षीही मोदी अत्यंत फिट आहेत. विशेष म्हणजे ते कमालीचे सक्रिय आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, सतत दौरे करणं, सातत्याने लोकांशी संवाद साधणं ही कामे ते आजही लिलया करत असतात. सतत उत्साही आणि सक्रिय राहण्यासाठी मोदी आपल्या आरोग्याकडे (health) विशेष लक्ष देत असतात. तसेच आपलं रुटीन कसं व्यवस्थित होईल यावर त्यांचा भर असतो. त्यांचं हेल्थ केअर रुटीन केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर तरुणांनाही आदर्शवत असच आहे. तुम्हीही मोदींसारखं रुटीन फॉलो करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. त्यामुळे आजच खालील पदार्थ आणि डाएट फॉलो करा.

लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठांची इम्यूनिटी कमकुवत होत असते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. बुजुर्गांनी नाश्त्यात चहा आणि बिस्किट घेतले पाहिजे. तुम्हाला डायबिटीज नसेल तर चहासोबत अक्रोड किंवा अंजीर घेऊ शकता. सकाळी उठल्यावर दोन तासाच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुम्ही दूध घेऊ शकता किंवा पोहे, उपमा किंवा पराठा खाऊ शकता.

food

food

सकाळी जेवणात तुम्ही हिरव्या भाज्या किंवा डाळ खायला हवी. रोज वेगवेगळ्या डाळींचं सेवन करा. कारण या वयात प्रोटीनसारख्या न्यूट्रिएंट्सची कमतरता जाणवते. डाळीतून तुम्हाला ही पोषक तत्त्व मिळतात. संध्याकाळी तुम्ही चहासोबत पोहे किंवा मोड आलेली कडधान्य चाट म्हणून खाऊ शकता.

food

food

डिनरमध्ये तुम्ही ओट्सपासून बनवलेला पदार्थ किंवा खिचडी खाऊ शकता. ओट्सपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये भाज्या टाकायला विसरू नका. तुम्ही जर भाजी आणि चपाती खात असाल तर डाएटमध्ये फायबरवाल्या पीठाचा समावेश करा. तुपाचा वापरही योग्य प्रमाणात करा. वयाच्या एका टप्प्यावर बुजुर्ग लोक उकडलेले पदार्थ खातात. त्यामुळे खोकल्याचा त्रास होतो.

vegetables

vegetables

जर तुम्ही भाजी किंवा चपाती खात नसाल तर सूप बनवून प्या. सूपमधून भाज्या काढू नका. नाही तर शरीरातील खनिज, व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडेंट्सची कमतरता पूर्ण होईल.

food

food

या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याहीवेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खा. त्याशिवाय अंजीरही खा, त्यामुळे भरपूर एनर्जी मिळेल. दहीसुद्धा एक सुपरफूड आहे. त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं.

food

food

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.