AAP | आम आदमी पार्टीचं नवं मिशन, मोदी शहांच्या गुजरातसह सहा राज्यांची निवडणूक लढवणार, अरविंद केजरीवालांची घोषणा

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी येत्या दोन वर्षांत सहा राज्यातील निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केले. ( Arvind Kejriwal AAP)

AAP | आम आदमी पार्टीचं नवं मिशन, मोदी शहांच्या गुजरातसह सहा राज्यांची निवडणूक लढवणार, अरविंद केजरीवालांची घोषणा
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री नवी दिल्ली
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:01 PM

नवी दिल्ली: आम आदमी (AAP) पार्टीचे संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी येत्या दोन वर्षांमध्ये सहा राज्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा केली. आम आदमी पक्ष आता दिल्लीच्या बाहेर कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार करत असल्याचं दिसून येतेय. आम आदमी पक्ष उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. आम आदमी पक्षाच्या नवव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल बोलत होते. (Arvind Kejriwal said the AAP party will contest elections in six states Uttar Pradesh, Uttarakhand, Goa, Punjab, Himachal Pradesh and Gujarat)

अरविंद केजरीवाल याविषयी बोलताना म्हणाले, देशातील इतर राजकीय पक्षांकडे विकासाची दृष्टी नाही. ते सर्व पक्ष भूतकाळाविषयी बोलतात. आप ही एकच पार्टी आहे जी भविष्याविषयी विचार करते. आपकडे 21 व्या आणि 22 व्या शतकाची दृष्टी आहे, असं केजरीवाल म्हणाले.

पुढील दोन वर्षात होणाऱ्या सहा राज्यांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. गेल्या 70 वर्षात इतर राजकीय पक्षांना जे जमलं नाही ते आपण फक्त 5 वर्षांमध्ये करुन दाखवलं असं, केजरीवाल म्हणाले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केले.

आम आदमी पक्षाला स्थानिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा, असं अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या सदस्यांना सांगितले. पक्षाचा विस्तार देशात गावपातळीपर्यंत करा, अंस आवाहन केजरीवालांनी केले. लवकरच पक्ष संघटना मजबूत केलजी जाणार आहे. संपूर्ण देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपला देशाच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाला गाव पातळीवर न्या, असं केजरीवाल म्हणाले.

लातूरमधील एक ग्रामपंचायत आपकडे

दिल्लीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षानंही राज्यात विविध ग्रामपंचायतीमध्ये मिळून 145 सदस्य निवडून आणले आहेत. इतकच नाही तर लातूर जिल्ह्यातील दापक्याळ या गावासह अन्य तीन गावांमध्ये एकहाती सत्ताही मिळवली आहे.

संबंधित बातम्या:

‘आप’ने महाराष्ट्रात खातं खोललं, मराठवाड्यातील ग्रामपंचायत जिंकली, केजरीवाल म्हणाले, भारी!

Special Report : ‘आप’ला महाराष्ट्र! राज्यभरात 145 ग्रामपंचायत सदस्य, ‘आप’च्या यशामागचं गमक काय?

(Arvind Kejriwal said the AAP party will contest elections in six states Uttar Pradesh, Uttarakhand, Goa, Punjab, Himachal Pradesh and Gujarat)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.