AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथविधीनंतर दिला वादग्रस्त नारा, संसदेत मोठा गदारोळ

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिलाय. शपथविधीनंतर त्यांनी जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्याने अनेक खासदारांनी याचा विरोध केला, त्यानंतर हा शब्द रेकॉर्डमधून काढण्याचे आदेश देण्यात आले.

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथविधीनंतर दिला वादग्रस्त नारा, संसदेत मोठा गदारोळ
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 25, 2024 | 4:53 PM
Share

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. ज्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला होता. गोंधळ झाल्यानंतर राधामोहन सिंह यांनी हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. ओवेसी यांच्या या घोषणेला भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी विरोध केला आणि ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही केली. विरोध झाल्यानंतर ओवेसी म्हणाले की, ते (जी किशन रेड्डी) विरोध करतात, हे त्यांचे काम आहे. मला जे म्हणायचे होते ते आम्ही बोललो. त्यांना खूश करण्यासाठी मी काही का बोलू?

शब्द रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश

ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन…’ असा नारा दिला. यावर खासदार शोभा करंदलाजे यांनी प्रश्न उपस्थित केला. यानंतर संसदेतील इतर सदस्यांनीही जय पॅलेस्टाईनबाबत आक्षेप घेतला होता. यावरुन वाद वाढत चालला असताना राधामोहन सिंह यांनी तो रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले.

जी किशन रेड्डी म्हणाले की, एकीकडे संविधानाबद्दल बोलयाचे आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधात घोषणा द्यायच्या. भारतात राहून पॅलेस्टाईनची गाणी गाणे हे चुकीचे आहे. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर आलाय. हे लोक नेहमीच प्रत्येक विषयावर असे प्रकार करतात.’

उर्दूमध्ये घेतली शपथ

ओवेसी यांनी उर्दूमध्ये खासदारकीची शपथ घेतली. त्यांचं नाव जेव्हा शपथ घेण्यासाठी पुकारण्यात आलं. तेव्हा काही खासदारांनी भारत माता की जय चा नारा दिला. तर काही खासदारांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. ओवेसी शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम जय भीमचा नारा दिला. यानंतर त्यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. यानंतर पुन्हा जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या.

ओवेसी पाचव्यांदा खासदार

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत, ओवेसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता