AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘असेच वाहवत जाल तर’, असदुद्दीन ओवेसी यांना संताप अनावर, तरुणांना झाप झापले, झाले तरी काय, एकच चर्चा

asaduddin owaisi speech : ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीनचे (AIMIM) मुख्य नेते असदुद्दीन ओवेसी यांचे एक भाषण सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी तरुणांना झाप झापलं आहे. त्यांचा संताप आतापर्यंत धार्मिक बाबीवरून दिसून आला. पण यावेळी कारण वेगळे आहे. त्यांनी देशभरातील तरुणांना एक मोठा संदेश दिला आहे. का झाला ओवेसी यांचा संताप अनावर, काय म्हणाले ते?

'असेच वाहवत जाल तर', असदुद्दीन ओवेसी यांना संताप अनावर, तरुणांना झाप झापले, झाले तरी काय, एकच चर्चा
'असेच वाहवत जाल तर', असदुद्दीन ओवेसी यांना संताप अनावर, तरुणांना झाप झापले, झाले तरी काय, एकच चर्चा
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 4:54 PM
Share

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची पहलगाम हल्ल्यानंतरची भूमिका सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पाकिस्तानविरोधात अनेक देशात जाऊन भारताची भूमिका मांडली. कट्टर धार्मिक नेते ते आता बदललेले ओवेसी हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. ओवेसी यांचे एक भाषण सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी तरुणांना झाप झापलं आहे. त्यांचा संताप आतापर्यंत धार्मिक बाबीवरून दिसून आला. पण यावेळी कारण वेगळे आहे. त्यांनी देशभरातील तरुणांना एक मोठा संदेश दिला आहे. का झाला ओवेसी यांचा संताप अनावर, काय म्हणाले ते?

बाबांनो, तुमचे डोकं खराब होईल

आजचा तरुणच नाही तर अबालवृद्ध सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत. काही जण तर तासनतास रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ बघण्यात वाया घालवतात. त्यांना वेळेचे भान उरत नाही. या व्यसनाने अनेक जण व्याधीग्रस्त आहेत. काहींना तर मोबाईलशिवाय जेवण जात नाही. त्यांची झोप उडालेली आहे. या सर्व बाबींमुळे ओवेसी चिडले. त्यांनी तरुणांचे चांगलेच कान टोचले आहेत. तुम्ही रील पाहण्यात वेळ घालवाल तर नेता, डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक कधी होणार? रील पाहिल्यावर केवळ डोकंच कामातून जात नाही तर वेळ पण वाया जातो. तुम्ही तुमच्या अधिकाराविषयी, तुमच्या हक्काविषयी, कर्तव्याविषयी कधी जागरूक व्हाल. कधी तुमच्या हक्काविषयी जाब विचारला. अन्यायाविरोधात आवाज उठवाल, असे खडे बोल त्यांनी तरुणांना सुनावले.

हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी तरुणांशी संवाद साधला. बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. तिथे मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षणाचे काम सुरू आहे. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू आहे. अनेक लोकांना तिथे बांगलादेशी, नेपाळी आणि म्यानमारमधील रोहिंग्या असल्याचे सांगत त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येत आहेत. त्यात विशेषतः अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. जर तुमच्याकडे मतदार अधिकारी, निवडणूक विभागाचा कर्मचारी आला तर त्याच्या प्रश्नाची उत्तरं कशी द्याल असा सवाल त्यांनी केला. त रील्सच्या चक्करमध्ये, गर्तेत अडकू नका असा सल्ला त्यांनी सर्वच तरुणांना दिला.

मागच्या दरवाजाने NRC

बिहार निवडणूक आयोगाच्या SIR या मोहिमेवर त्यांनी चांगलेच तोंडसूख घेतले. त्यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले. भारतीय नागरिकता निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी या एसआयआर मोहिमेमागे केंद्र सरकारचा एनआरसी आणण्याचा हात असल्याचा आरोप केला. निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून कोण बांगलादेशी, नेपाळी आणि म्यानमारचे नागरिक आहेत, त्यांची यादी पडताळून पाहण्याचे निर्देश त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिले. या मोहिमेमागे शुद्ध हेतू नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी त्यांनी तरुणांना सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्वलंत प्रश्नावर त्यांची मतं मांडण्याचा आणि अधिकारांबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.