
इथियोपियातील अफार येथील हायली गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या ज्वालामुखीची राख थेट भारतामध्ये पोहोचली आहे. लाल समुद्र पार करून ज्वालामुखीच्या राखेचे ढग राजस्थान, हरियाणा, दिल्लीत पोहोचले. हवेत राखेचे कण जाणवत असून हवा अत्यंत घातक बनली. हेच नाही तर सुर्याचा प्रकाशही म्हणावा तसा पडत नाही. रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मध्यरात्री राखेचे ढग भारतात दाखल झाली. भारतातील काही राज्य संकटात असून थेट विमानसेवा बंद करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला. ही राख विमानाच्या इंजिनसाठी धोकादायक असून विमानाचे इंजन बंद पडू शकतात, अशी चेतावणी थेट देण्यात आली. दिल्लीमध्ये स्थिती अधिक गंभीर होत आहे.
एअर इंडियाने एक्सवर याबद्दलची एक पोस्ट शेअर केली. एअर इंडियाने म्हटले की, आम्ही या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. ऑपरेटिंग क्रूशी सतत संपर्कात आहोत. शक्य तितक्या लवकर पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचे ढग पश्चिम भारताकडे सरकत असल्याचे कळतंय. तुमची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियाने म्हटले.
अकासा एअरने 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, कुवेतसोबतच अबू धाबीला जाणाऱ्या फ्लाइट रद्द केल्या आहेत. डच एअरलाइन्सने त्यांच्या अॅमस्टरडॅम-दिल्ली KL 871 आणि दिल्ली-अमस्टरडॅम (KL 872) फ्लाइट रद्द केल्या आहेत. देशातील विमानसेवा या ज्वालामुखीच्या राखेमुळे विस्कटलेली दिसत आहे. विमान कंपन्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सातत्याने विमाने रद्द केली जात आहेत. हेच नाही तर वातावरणही खराब या ज्वालामुखीच्या राखेमुळे झालंय.
#WATCH | New Delhi | Visuals from Indira Gandhi International Airport.
After Ethiopia’s Hayli Gubbin volcano erupted on Sunday, the Directorate General of Civil Aviation (DGCA) issued an advisory to airlines asking them to avoid altitudes and regions affected by ash clouds. pic.twitter.com/ytEEIsw7xH
— ANI (@ANI) November 24, 2025
भारतात संकट आले असून मिळालेल्या माहितीनुसार, राखेचे काही ढग टेकड्यांवर आदळतील आणि चीनच्या दिशेने पुढे जातील. या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारताच्या डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना एक सूचना जारी केली. यामध्ये सांगण्यात आले की, ज्वालामुखीची राख ज्या उंचीवर आहे. त्या भागांवरून विमाने चालवू नयेत. राखेचे ढग विमानाच्या इंजिनांना आणि उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. त्यानंतर विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेत विमाने रद्द केली.