AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो गुन्हेगार आहे म्हणून गोळ्या घालणार का? एन्काऊण्टरवर नितीश संतापले, तेजस्वी म्हणाला की, ‘अतिक-अश्रफच्या हत्येचं…’

latest news of atiq ahmed : मुख्यमंत्र्यांनी चुकीचं सांगितलं आहे की, आरोपी पत्रकार बनून आले होते. कोण तिथं येऊन उभं राहिलं आहे. हे पोलिसांनी पाहायला हवं होतं. पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवायला हवी होती.

तो गुन्हेगार आहे म्हणून गोळ्या घालणार का? एन्काऊण्टरवर नितीश संतापले, तेजस्वी म्हणाला की, 'अतिक-अश्रफच्या हत्येचं...'
atiq ahmed brother ashraf double murder is scripted says tejashwi yadav nitish kumar slaims yogi governmentImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 17, 2023 | 1:12 PM
Share

बिहार : संपूर्ण देशात उत्तर प्रदेशातील (UP) हत्याकांडाची चर्चा सुरु आहे, अनेकांनी या सगळ्या प्रकरणावर टीका केली आहे. अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. देशभरातील नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये माजी खासदार अतिक अहमद आणि अशरफ यांच्या (atiq ahmed brother ashraf) हत्येप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (tejashwi yadav) यांनी उत्तरप्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, कोणी तुरुंगात गेले तर त्याला अशा पद्धतीने मारले जाईल का ? अशा कडक शब्दात नितीश कुमार यांनी भाजप सरकारवरती टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी चुकीचं सांगितलं आहे की, आरोपी पत्रकार बनून आले होते. कोण तिथं येऊन उभं राहिलं आहे. हे पोलिसांनी पाहायला हवं होतं. पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवायला हवी होती. युपीच्या सरकारला राज्यातील कायदा आणि व्यवस्था याबाबत विचार करायला हवा, आपल्या देशात न्यायालय न्याय देण्यासाठी आहे. आरोपींचा आपल्या देशात कधीचं सन्मान होणार नाही.

त्याचबरोबर तेजस्वी यादव यांनी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिस कस्टडीबाबत विधान केलं आहे. ‘एक मारेमारी हा मारेकरीचं असतो, यामध्ये अजिबात सहानभूती नाही. अशा पध्दतीने कोणी खून केलातर त्यांना प्रश्न विचारणे गरजेचं आहे. हे सगळं प्लॅननूसार असल्यासारखं वाटतं आहे. देशातील गुन्हेगार नक्की संपले पाहिजेत, त्यासाठी सुध्दा एक चांगला मार्ग आहे.’

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची हत्या झाल्यापासून युपीच्या सरकारवरती अनेकांनी जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर त्या प्रकरणाबाबत वेगवेगळे मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. उत्तरप्रदेशात विरोधकांनी सुध्दा सरकारवरती जोरदार टीका केली आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.