AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan Crime : महिलेला डायन ठरवून तिची झोपडी पेटवली, मग तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

आग लागल्यानंतर महिला झोपडीतून बाहेर आल्यावर तिला तेथील लोकांनी पकडून पुन्हा आगीत टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी तिला मारहाण केली. पीडित महिलेने कसे तरी स्वत:ला सावरले आणि गावच्या माजी सरपंचापर्यंत पोहोचली. माजी सरपंचाने तिला पाठिंबा देत आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

Rajasthan Crime : महिलेला डायन ठरवून तिची झोपडी पेटवली, मग तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, राजस्थानमधील धक्कादायक प्रकार
महिलेला डायन ठरवून तिची झोपडी पेटवली, मग तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Jun 22, 2022 | 4:40 PM
Share

राजस्थान : राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. अंधश्रद्धे (Superstition)तून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला डायन ठरवून तिला जिवंत जाळण्या (Burn Alive)चा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात घडली आहे. महिला कसाबसा स्वतःचा बचाव करत पळत पळत माजी सरपंचाच्या घरापर्यंत पोहचली. यावेळी गावच्या माजी सरपंचाने तिला आसरा देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने मसुदा पोलीस ठाण्यात तक्रार (Complain) दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश जीवनी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याचा तपास करीत आहेत.

अनेक महिन्यांपासून गावातील लोक डायन ठरवून त्रास देत होते

पीडित महिला मसुदा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नसून गावची रहिवासी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील काही लोक तिला डायन ठरवून त्रास देत होते. अखेर गावातील लोकांच्या अत्याचारानंतर महिलेने आपल्या शेतात झोपडी बनवून राहायला सुरुवात केली. मात्र तिथेही महिलेला त्रास देण्यासाठी लोक पोहचले. गावातील काही लोक मंगळवारी संध्याकाळी तिच्या शेतात घुसले आणि तिच्या झोपडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. मात्र महिलेने सतर्कता दाखवत तात्काळ झोपडीतून बाहेर धाव घेतली.

आगीतून वाचल्याने पुन्हा जिवंत जाळण्याचा प्रयत्न

आग लागल्यानंतर महिला झोपडीतून बाहेर आल्यावर तिला तेथील लोकांनी पकडून पुन्हा आगीत टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी तिला मारहाण केली. पीडित महिलेने कसे तरी स्वत:ला सावरले आणि गावच्या माजी सरपंचापर्यंत पोहोचली. माजी सरपंचाने तिला पाठिंबा देत आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने मसुदा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. (Attempt to burn a woman alive through superstition in Rajasthan)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.