AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शॉटगन’नंतर बंगालमध्ये बाबुल सुप्रियोच ‘सुप्रिम’; बंगालमध्ये मात्र भाजपचे हात रिकामेच

By Election Results 2022 : देशातील 1 लोकसभा आणि 4 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे (TMC)शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत, तर बालीगंगे विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) विजयी झाले आहेत. दुसरीकडे, बिहारमधील बोचाहान विधानसभेच्या जागेवर आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून […]

'शॉटगन'नंतर बंगालमध्ये बाबुल सुप्रियोच 'सुप्रिम'; बंगालमध्ये मात्र भाजपचे हात रिकामेच
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोImage Credit source: TV9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 16, 2022 | 4:51 PM
Share

By Election Results 2022 : देशातील 1 लोकसभा आणि 4 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे (TMC)शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत, तर बालीगंगे विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) विजयी झाले आहेत. दुसरीकडे, बिहारमधील बोचाहान विधानसभेच्या जागेवर आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने कमबॅक केले आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा जवळपास 19,000 मतांनी पराभव केला. छत्तीसगडमधील खैरागड विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचला. आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा सुमारे २ लाख मतांनी विजयी झाले आहेत. या जागेवरून टीएमसी कधीही जिंकली नव्हती, त्यामुळे या विजयाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे बालीगंगे विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे विधानसभा मतदारसंघांतून भाजपच्या उमेदवार काया घोष यांचा पराभव केला. त्यामुळे देशातील या पोटनिवडणूकात भाजपला (BJP) रिकाम्या हातांनी जावं लागत आहे.

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला आहे. बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत. सुप्रियो यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी CPI(M) च्या सायरा शाह हलीम यांचा 19,904 मतांनी पराभव केला. आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर टीएमसी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेचे आभार मानले. सुरुवातीच्या टप्प्यापासून बऱ्यापैकी आघाडी मिळवणाऱ्या बाबुल सुप्रियो यांनी अखेर आपला विजय निश्चित केला. त्याचवेळी या जागेसाठी भाजपला तिसऱ्या तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकाचा मते मिळाली.

मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

खरं तर बालीगंगेचे आमदार आणि टीएमसी सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली. बालीगंज येथील डेव्हिड हेअर ट्रेनिंग कॉलेजमध्ये शनिवारी झालेल्या मतमोजणीच्या १९ फेऱ्यांनंतर टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांचा 20038 मतांच्या फरकाने पराभव केला.

मां, माटी, मानुष की जीत

बाबुल सुप्रियो यांनी आपल्या विजयानंतर म्हणाले की, मां, माटी, मानुष की जीत है. तसेच आसनसोलमध्ये टीएमसीचा विजय ही भाजपच्या तोंडावर चपराक आहे. तसेच ते म्हणाले, मी भाजपसाठी दोन गोल केले होते, आता मी टीएमसीसाठी 10 गोल करेन. तसेच मी, ज्या पक्षात राहतो त्या पक्षासाठी मी माझा जीवही देतो. मला ते सिद्ध करण्याची गरज नाही. यापूर्वी मी भाजपसाठी 2 गोल केले होते, आता मी टीएमसीसाठी 10 गोल करेन. 20,000 अधिक मतांचा विजय मी ममता बॅनर्जी आणि TMC संघटनेला समर्पित करतो. तसेच मोठे नेते काम करत आहेत. सर्व चांगले काम करत आहेत. दोन लोकांच्या फरकाने टीएमसी संघटनेत प्रवेश होत आहे. कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहेत. हा जनतेचा आणि सर्वसामान्यांचा विजय आहे. तर बाबुल सुप्रियो यांच्या विजयानंतर बंगालमध्ये असे तर्क लावले जात आहेत की, ते ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सामील होतील.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ट्विट

बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचण्याकडे वाटचाल करत असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या विजयाबद्दल ट्विट केले. तसेच त्यांनी यात, जनतेचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

इतर बातम्या : 

Video : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स!”

Satej Patil: ‘बळी राजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे’… सतेज पाटलांचं जोतिबाला साकडं

Pune fire incident : पुणे नाशिक महामार्गावर भोसरीजवळ प्लायवूडच्या गोडाउनला भीषण आग; जीवितहानी नाही

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा