AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga: एकाहून एक डेंजर भविष्यवाणी, बाबा वेंगा आहे तरी कोण? इराण युद्धाविषयी काय भाकीत?

Balkan Nostradamus Baba Vanga: बाबा वेंगा हिच्या अनेक भविष्यवाण्यांनी समाज माध्यमं आणि डिजिटल मीडियात धुमाकूळ घातला आहे. तिच्या नावाने अनेक भाकीत खपवण्यात आली आहे. बाबा वेंगा हे नाव जर विचित्र वाटत असले तरी ते तिचे खरे नाव नाही. बुल्गारियाची ही भविष्यवेत्ता नेमकी आहे तरी कोण?

Baba Vanga: एकाहून एक डेंजर भविष्यवाणी, बाबा वेंगा आहे तरी कोण? इराण युद्धाविषयी काय भाकीत?
बाबा वेंगाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 04, 2026 | 2:07 PM
Share

Baba Vanga Prediction: बुल्गारियाची गुढ भविष्यवेत्ती बाबा वेंगा ही जगभरात तिच्या अचूक आणि खतरनाक भविष्यवाणीसाठी ओळखली जाते. 9/11 हल्ला, चेर्नेबिल दुर्घटना अथवा सोव्हिएत संघाचे विघटन यासारख्या जगातील प्रमुख घडामोडींविषयी तिने अगोदरच भाष्य केलेले होते. तिची भविष्यवाणी खरी ठरली. या अंध भविष्यवेत्तीला बाल्कनचा नॉस्ट्रेडमसही म्हटल्या जाते. तिच्या नावावर अनेक भविष्यवाण्या पण खपवण्यात येतात. अर्थात तिच्या भविष्यावाण्यांकडे जग गांभीर्याने पाहते. पण तिला बाबा वेंगा हे नाव का पडलं? तिचे खरं नाव काय? असा सवालही अनेकांना पडला आहे.

वेंगेलिया पांडेवा सुरचेवा

बाबा वेंगा हिचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 होजी ऑटोमन साम्राज्यातील उत्तरी मेसिडोनिया येथील स्टुमिका येथे झाला. तिचे पूर्ण नाव वेंगेलिया पांडेवा सुरचेवा (नंतर गुश्तरोवा) असे होते. नऊ महिन्यांच्या आताच तिचा जन्म झाल्याने तिचे नाव उशीरा ठेवण्यात आले. स्थानिक प्रथेनुसार एका अज्ञात व्यक्तीला तिचे नाव सुचवण्यास सांगण्यात आले. त्याने तिचे नाव वेंगेलिया असे सुचवले. ग्रीक नाव इवांजेलियाचे ते बुल्गारियन स्वरुप आहे. त्याचा अर्थ शुभ बातमी देणारी, वार्ता आणणारी अथवा ख्रिश्चन सुवार्ता आणणारी असा होतो.

आजीबाई वेंगा

तिचं आयुष्य हे सर्वसामान्य मुलींसारखंच होतं. पण 12 व्या वर्षी एका मोठ्या वादळात ती फसली आणि कशाचा तरी फटका लागून तिच्या डोळ्यांना इजा झाली. तिची दृष्टी गेली. त्याचवेळी तिला विचित्र भास होऊ लागले. तिला अध्यात्मिक घटना आणि भविष्यातील घटना स्पष्टपणे दिसू लागल्या. द्वितीय महायुद्धात तिने देशाचे सैनिक सुखरूप परतील असे भाकीत केले. ते खरे ठरले आणि ती लोकप्रिय झाली. वेंगालियाचे वेंगा झाले. ती सर्वांची लाडकी वेंगा आजी झाली.

ती बुल्गेरियातील पेत्रिच या गावात राहत होती. स्थानिक लोक तिला बाबा वेंगा असे म्हणू लागले. बाबा या शब्दाचा बुल्गेरियन आणि स्लाविक भाषेत अर्थ आजी असा होतो. वृद्ध स्त्री अशा अर्थाने बाबा हा शब्द प्रचलित आहे. तेव्हापासून तिचे नाव बाबा वेंगा असे झाले. तिच्याप्रती लोक आदर व्यक्त करू लागले. 1996 साली 84 व्या वर्षी बाबा वेंगा हिचा मृत्यू झाला. तोपर्यंत ती जगात बाबा वेंगा या नावानेच लोकप्रिय झाली होती.

इराण युद्धाविषयी काय भाकीत?

2026 मध्ये एका देशावरील हल्ल्यानंतर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. जगातील बड्या राष्ट्रांमध्ये अधिक तणाव वाढेल. चीन, तैवानला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला यश येणार नाही. पुढील वर्षी रशिया आणि अमेरिकेत थेट संघर्ष होऊन तिसर्‍या महायुद्धाला तोंड फुटेल, असे भाकीत बाबा वेंगाने केले आहे.

सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा