बांगलादेश आणि पाकिस्तान व्यापारी जवळीक वाढली, भारतावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या
भारतासाठी शेजारी राष्ट्र ही कायम डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. पाकिस्तानकडून तर कायम कुरापती होत असतात. तर चीन आपल्या बलाढ्य शक्तिचं प्रदर्शन करून दाखवत असतं. आता दुबळ्या आणि वारंवार भारतात घुसखोरी करणारा बांगलादेशही डोकेदुखी ठरू लागला आहे. कारण बांगलादेशने आता पाकिस्तानशी हातमिळवणी केली आहे.

बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ झाली आणि सत्तांतर झालं. या सत्तांतरानंतर राजकीय गणितं तर बदलली, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचा परिणाम दिसून आला आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांचं 1971 मध्ये विभाजन झालं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही व्यापारी दृष्टीकोनातून एकत्र आले आहेत. फेब्रुवारी 2025 च्या सुरुवातीला दोन्ही देशात करार झाला आहे. दोन्ही देशांनी व्यापारी सलोखा जपण्याचं धोरण अवलंबलं आहे. गेल्या काही दशकांपासून निष्क्रिय असलेल व्यापारी मार्ग पुन्हा एकदा सक्रीय करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकलं आहे. यानंतर पाकिस्तानच्या कासिम बंदरातून माहवाहू जहाज बांगलादेशला रवाना झालं. बांगलादेशने पाकिस्तानकडून 50 हजार टन तांदूळ खरेदी करण्यास हिरवा कंदील दिला. हा तांदूळ दोन टप्प्यात बांगलादेशला येणार आहे. यातील 25 हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशला रवाना झाली आहे. तर उर्वरित 25 हजार टन तांदूळ लवकरच पाठवली जाणार आहे. सध्याचा व्यापार पाहता दोन्ही देशातील आर्थिक संबंध मजबूत होतील. तसेट शिपिंग मार्ग सुलभ होतील. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. ...