Basavaraj Bommai : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ बस्वराज बोम्मई यांच्या गळ्यात, धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ बस्वराज बोम्मई यांच्या गळ्यात टाकण्यात आल्याची घोषणा पर्यवेक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. Basavaraj S Bommai CM of Karnataka

Basavaraj Bommai : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ बस्वराज बोम्मई यांच्या गळ्यात, धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
बसवराज बोम्मई
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 27, 2021 | 9:25 PM

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या जागेवर त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री बस्वराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

बस्वराज बोम्मई नेमके कोण आहेत?

बस्वराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच वीरशैव लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बस्वराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बस्वराज बोम्मई 2008 मध्ये जनता दलातून भाजपमध्ये आले होते. यापूर्वी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होतं. ते इंजिनिअर असून त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काही दिवस काम सुरु केलं होतं. बस्वराज बोम्मई दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तर, तीन वेळा हावेरी जिल्ह्यातील शिगांव मधून ते आमदार झाले आहेत.

येडियुरप्पा यांना राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर भाजपचा हा लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करुन संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

निर्णय जाहीर होण्यापूर्वी बसवराज बोम्मईंचा सावध पवित्रा

भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बस्वराज बोम्मई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. गेल्या काही दिवसात बोम्मई यांनी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. त्यांनी  काही दिवसांपूर्वी प्रल्हाद जोशी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत त्यांचंही नाव आलं होतं. मात्र, त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?

“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

इतर बातम्या: 

Karnataka CM BS Yediyurappa Resigns | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समुदायातील नको; येडियुरप्पा यांची भाजपला सूचना

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें