
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या विरोधाक पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे शनिवारी देखील हिंसक झडप झाली. मुर्शिदाबाद येथे एका बापलेकाची हत्या करण्यात आली. शमशेरगंज परिसरातील जाफदाबाद येथे हिंसक जमावाने पिता-पूत्राची हत्या केली. एका गावावर जमावाने हल्ला केला. याआधी मुर्शिदाबाद येथे शुक्रवारच्या ( ११ एप्रिल ) नमाजनंतर हिंसा भडकली होती. हिंसात्मक घटनेनंतर मुर्शिदाबाद येथे कलम १६३ लागू केले असून इंटरनेट बंद आहे. पोलीस आणि बीएसएफचा जबरदस्त पहारा आहे. निदर्शकांनी पोलीसांच्या व्हॅन आणि एम्ब्युलन्स जाळून टाकल्या आहेत. याच दरम्यान, भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी मुर्शिदाबाद येथे केंद्रीय दलाच्या तैनातीच्या मागणीवरुन कोलकाता धाव घेतली आहे.
मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या खुणा अजून मिटलेल्या नसताना आज पुन्हा या भागात पुन्हा हिंसा भडकली. यावेळी निदर्शकांनी एका बापलेकाची हत्या केली. मुर्शिदाबाद येथील सुतीत शुक्रवारी हिंसेला सुरुवात झाली होती. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर वक्फ कायद्याच्या विरोधात अनेक निदर्शक रस्त्यावर उतरले. आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ३४ ब्लॉक केला. जेव्हा पोलिसांनी नॅशनल हायवेवरील जमावाला हटविण्याचा प्रयत्न केला तर निदशर्कांनी पोलिसांवर दगड फेक केली.
मुर्शिदाबाद येथून १० किमोमीटरवर असलेल्या शमशेर गंज येथेही नॅशनल हायवेवर हजारो लोक जमले होते. शमशेरगंजच्या डाक बंगल्या जवळ निदर्शकांनी तांडव माजविण्यास सुरुवात केली.येथे पोलिसांच्या वाहनांना पेटविण्यात आले.त्यानंतर येथील एका पोलिस चौकीला तोडफोड करुन आगीच्या हवाली करण्यात आले.रस्त्यांच्याकडेला असलेल्या दुकानांना आणि दुचाकींना आगीच्या हवाली करण्यात आले.
हिंसक जमावाने धुलियान रेल्वे स्थानका शेजारील रेल्वे गेट आणि रिले रुमला लक्ष्य करण्यात आले.दगडांचा मारा करण्यात आला.घरांना पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी रेल्वेचे कर्मचारी स्वत:चे प्राण वाचवून कसेबसे पळाले. त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागिवली. आता येथे केंद्रीय रिझर्व्ह बलाचे सैनिकांनी परस्थितीवर कसे तरी नियंत्रण मिळविले. आता या भागात तणावपूर्ण शांतता आहे.