AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसा, आगी लावणे – बॉम्ब फेकीने मुर्शिदाबाद हादरले, पोलिसांवर दगडफेक

वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबादमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. सुतीमध्ये, निदर्शकांनी सरकारी बस जाळली आणि राष्ट्रीय महामार्ग १२ रोखला आहे. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे आणि अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

वक्फ विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसा, आगी लावणे - बॉम्ब फेकीने मुर्शिदाबाद हादरले, पोलिसांवर दगडफेक
| Updated on: Apr 11, 2025 | 9:03 PM
Share

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे वक्फच्या विरोधात सुरु असलेला हिंसाचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात सुती येथे हिंसाचार झाला. सरकारी बसेसना आग लावण्यात आली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ताज्या माहितीनुसार स्थिती असून नियंत्रणात आलेली नाही.

याआधी रघुनाथगंजच्या उमरपुरमध्ये दोन पोलिसांच्या वाहनांना आग लावली होती. भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ सुतीमध्ये लागू करण्यात आले आहे. तरीही निदर्शने सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 निदर्शकांनी बंद पाडले आहे. ट्रेनची वाहतूक देखील थांबविण्यात आली आहे. सुती येथील साजुर चौकात एका सरकारी बसला देखील आग लावण्याची घटना घडली आहे.

वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबादमध्ये हिंसा

वक्फ अधिनियमच्या विरोधात गेल्या दिवस मुर्शिदाबाद पेटलेले आहे. राज्याच्या विविध भागात हिंसाचार सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. सुती आणि शमसेरगंज परिसरातील हजारो लोकांच्या मोर्चा काढण्यात आला आहे. त्यांनी साजुर चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ बंद पाडण्यासाठी हिंसाचार केला, परंतू पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले आहे. या वेळी काही निदर्शकांनी बॉम्ब फेकल्याचे कथितरित्या म्हटले जात आहे. तसेच निदर्शकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांवर विटा आणि दगड फेकल्याने अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.

भाजपाचे आमदार गौरीशंकर घोष यांनी या आधीच भविष्यवाणी केली होती की वक्फ विधेयक पारित झाल्यानतर येथे स्थिती चिंताजनक होऊ शकते. ते म्हणाले की लोक घाबरलेले आहेत. सोशल मीडियावरील विभिन्न पोस्ट पाहून आम्ही घाबरलो आहोत. वक्फ विधेयकाविरुद्ध मुर्शिदाबाद येथे पुन्हा अशांततेचे वातावरण पसरु शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –

ममता बनर्जी संपूर्णपणे फेल: सुकांत मजूमदार

प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय राज्य मंत्री सुकांत मजूमदार यांनी सीएम ममता बनर्जीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की ममता बनर्जी पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखण्यास संपूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत.वक्फ विरोधी हिंसक निदर्शनाने राज्याला ठप्प केले आहे. मुर्शिदाबाद येथे अनेक एक्सप्रेस ट्रेन रोखण्यात आल्या आहेत. प्रवासी जागोजागी अडकले आहेत. घाबरलेले आहेत, रेल्वे परिसर युद्ध क्षेत्र बनले बनले आहेत असेही सुकांत मजूमदार यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांना हिंसाचाराची पुरेपुर कल्पना आहे

हे पहिल्यांदाच झालेले आहे असे नाही. राज्यात सीएए विरुद्ध अशाच प्रकाराची निदर्शने झाली होती आणि मुख्यमंत्री काय करत आहेत. काहीच नाही त्यांचे मौन निंदनीय आहे. यावरुन हे स्पष्ट होते की हिंसा भले त्यांच्या आशीवार्दाने झालेली नसेल मात्र त्यांना लपवून होत नाहीए, त्यांना हिंसाचाराची पुरेपुर कल्पना आहे. ते म्हणाले हे प्रशासन नाही. हे राजकीय लाभासाठी उग्रवादासमोर आत्मसमर्पण आहे. या संकटासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली पाहीजेच…

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.