AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan Special Burger: काय सांगताय? बर्गरवर सुद्धा उपवास सोडता येणार? श्रावणात मॅकडोनाल्डची भन्नाट ऑफर

Shravan Special Burger: श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणापासून विविध सणांची रेलचेल असते. अनेकजण श्रावणात उपवास करतात. एकवेळ जेवण, फराळ अथवा दूध यावर उपवास करण्यात येतो. पण आता बर्गरवर उपवास सोडता येईल असे तुम्हाला सांगितले तर? काय आहे मॅकडोनाल्डची भन्नाट ऑफर?

Shravan Special Burger: काय सांगताय? बर्गरवर सुद्धा उपवास सोडता येणार? श्रावणात मॅकडोनाल्डची भन्नाट ऑफर
उपवासाचा बर्गरImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 18, 2026 | 7:39 PM
Share

MacDonald Shravan Special Burger: बोली भाषेत, अनेक जण श्रावण धरतात, पाळतात. म्हणजे या महिन्यात केस कापत नाहीत. कडक उपवास करतात. व्रतवैकल्य करतात. हा महिना देवाला समर्पित करतात. काही जण एक वेळ जेवण करतात. काही जण दुधावरच उपवास करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण याकाळात शक्यतो बाहेरचे काही खात नाही. फलाहारावर जोर दिल्या जातो. धार्मिक मान्यतेनुसारच अन्नपदार्थांचे सेवण केलं जाते. पण तुम्ही बर्गरवर उपवास सोडू शकता, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर? काय आहे मॅकडोनाल्डची ती भन्नाट ऑफर?

Gen Z साठी उपवासाचा बर्गर?

मॅकडोनाल्डचा बर्गर, पिझ्झा आणि इतर पदार्थ हा खवय्यांसाठी पर्वणीच आहे. अनेकजण भूक लागली की झटपट मिळणाऱ्या या फास्टफुडकडे वळतात. काही जण घरी हे पदार्थ मिळतात. सध्या शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात हे पदार्थ मिळतात. पण उपवासाच्या क्षेत्रात मॅकडोनाल्डने लुडबुड केली नव्हती. Gen Z ही सुद्धा श्रावणात महादेव मंदिरात जाते. उपवास करते. हा ग्राहक वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी मॅकडोनाल्डने आता उपवासाचा बर्गर आणला आहे.

कुट्टू अथवा शिंगाड्याच्या पिठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ श्रावणात खाणे वर्ज्य नाही. अशावेळी जेन झीने उपवास धरला आणि त्यांना बर्गर खाण्याची इच्छा झाली तर? नेमकी हीच गोष्ट हेरत आणि हा ग्राहक वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी मॅकडोनाल्डने श्रावणासाठी एक खास मेनून आणला आहे. त्याला उपवासाचा बर्गर असे नाव दिले आहे.

कुट्टू, शिंगाडा पिठापासून बर्गर?

अनेक लोकांना वाटत असेल की हा बर्गर कुट्टू अथवा शिंगाडा पिठापासून तयार करण्यात आला असावा. पण तसे नाही. श्रावण स्पेशल मेन्यूमध्ये जो बर्गर आहे. तो शिंगाडा पिठापासून तयार करण्यात आलेला नाही. कारण हा उपवास सोडण्यासाठीचा बर्गर असल्याने त्यात काही विशेष काळजी नक्कीच घेण्यात आली आहे.

काय आहे या बर्गरमध्ये?

या बर्गरमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर करण्यात आलेला नाही. विना मीठाचे फ्राईज आहे. याशिवाय काही श्रावण स्पेशल मेन्यू आहेत. हे मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर लोक मजेशीर कमेंटसुद्धा देत आहेत. अर्थात श्रावणी मासी, किती खाशी? असा सवालही अनेकांच्या मनात येत आहे.

बर्गरवर कमेंटचा पाऊस

MacDonald ने श्रावण स्पेशल मेन्यू सादर केला. तेव्हा त्यावर सोशल मीडियातून भन्नाट कमेंट आल्या. अनेकांनी आता उपवासाचा बर्गर म्हटल्यावर तो उपवास असेल का असा सवाल केला आहे. तर काहींनी बर्गरच खायचा तर मग उपवास कशाला धरायचा असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकूणच या भन्नाट प्रयोगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात