चीनकडून पुन्हा विश्वासघात, भारताला सर्वात मोठा धक्का, पाकिस्तानला दिलं मोठं गिफ्ट, टेन्शन वाढलं

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मैत्रीचं नाटक करणाऱ्या चीनकडून पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात करण्यात आला आहे, पाकिस्तानला चायनानं मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

चीनकडून पुन्हा विश्वासघात, भारताला सर्वात मोठा धक्का, पाकिस्तानला दिलं मोठं गिफ्ट, टेन्शन वाढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 9:47 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र झाला आहे, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त झाले, या एअर स्ट्राईकमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील शत्रूत्व हे जगजाहीर आहे, दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची सतत स्पर्धा सुरू असते, असं एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये भारत पाकिस्तानच्या मागे आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतानं पाकिस्तानला मांग टाकलं आहे, पाकिस्तान कोणत्याच क्षेत्रात पुढील कित्येक वर्ष भारताची कधीच बरोबरी करू शकणार नाही.

मात्र आता एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एका क्षेत्रामध्ये आता पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पाणबुड्यांशी संबंधित हे क्षेत्र आहे. पाकिस्तानला आता लवकरच म्हणजे 2026 मध्ये AIP तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली पाणबुडी मिळणार आहे, तर भारताला हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आणखी सात वर्ष म्हणजे 2032 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र तेव्हा देखील हे तंत्रज्ञान भारताला मिळेलच याची कोणतीही खात्री अद्याप तरी नाहीये.

चीनच्या सहकार्यानं बनवलेल्या या विशेष पाणबुड्यांची पहिली खेप पाकिस्तानला पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाकिस्तानचे नौदल प्रमुख अॅडमिरल नवीद अशरफ यांनी खुलासा केला आहे. हा चीन आणि पाकिस्तानमधील मोठा करार मानला जात आहे. याबाबत बोलताना नवीद अशरफ यांनी म्हटलं आहे की, या विशेष प्रकारच्या पाणबुड्यांमुळे पाकिस्तानची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पाणबुडीविरोधी युद्ध, समुद्री हद्द सुरक्षा आणि हवाई क्षेत्र संरक्षणामध्ये आम्हाला या पाणबुडीचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.

दरम्यान एकीकडे अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर चीनकडून भारतासोबत मैत्रीचा हात पुढे करण्याचं नाटक केलं जात आहे, तर दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा चीन कडून भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या पाकिस्तानची मोठी मदत करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानची ताकद वाढणार आहे.