AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं

Mamata Banerjee vs Suvendu Adhikari : भवानीपूरमधील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी मतमोजणी पूर्ण होण्याआधीच मोठी घोषणा केली आहे. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आव्हान आहे. दीदींविरोधात लढणारे सुवेंदू अधिकारी यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकतोय.

वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं
Mamata Banerjee vs Suvendu Adhikari
| Updated on: May 04, 2026 | 10:29 AM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरच्या निकालावर सगळ्या मीडियाचं बारीक लक्ष आहे. इथे बंगाल निवडणुकीतील हाय प्रोफाईल लढाई आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा सामना आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपने इथून त्यांचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे. ते सुद्धा भाजपचा संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. त्यामुळे ममता विरुद्ध सुवेंदू या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. भाजपसाठी ममता बॅनर्जी यांना सत्तेतून हटवणं हे मुख्य टार्गेट आहे.

“मला भवानीपूरमधून अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. पहिल्या राऊंडमध्ये मुस्लिम बूथ आहेत. सहाव्या-सातव्या राऊंडपासून हिंदू बूथवरील काऊंटिंग सुरु होईल. भवानीपूरमधून माझ्यासाठी चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा आहे. सगळे चॅनल्स दाखवतायत की, मी आघाडीवर आहे. नंदीग्राममध्ये मला अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. मला तीनपट जास्त मतं मिळाली आहेत. भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवेल अशी मला अपेक्षा आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. भवानीपूरमध्ये भाजपने त्यांना तृणमुल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक मैदानात उतरवलं आहे.

काँटे की टक्कर

“भाजप सरकार बनवणार. प्राथमिक कल आहेत, त्यानुसार भाजप 135 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तृणमुल काँग्रेस जवळपास 100 जागांवर पुढे आहे. सुरुवातीला भवानीपूरमध्ये काँटे की टक्कर दिसेल. पहिल्या राऊंडच्या मतमोजणीत 14 बूथ पैकी 6 मुस्लिम बहुसंख्य असलेले बूथ आहेत. त्यांना तिथे 90 ते 95 टक्के मतं मिळायची. पण यावेळी असं होणार नाही” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. “यावेळी तडा गेलाय. हिंदू बहुसंख्य असलेल्या 8 बूथवर मी आघाडीवर आहे. 9-10 व्या फेरीनंतर मी भवानीपूरमधून आघाडीवर असेन” असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

हे आमच्यासाठी चांगलं चिन्ह

“प्रस्थापित सरकार विरोधात लाट आहे. हिंदुंची एकगठ्ठा मत भाजपच्या बाजूने आहेत. हे आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूरमध्ये मुस्लिम मतांची विभागणी झालीय” असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले