AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Assembly Election Result 2026 : सगळ्या देशाच लक्ष भवानीपूरवर, भाजपकडून ममता बॅनर्जी यांना पहिला धक्का, काँटे की टक्कर

West Bengal Assembly Election Result 2026 : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा क्षेत्रावर सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. इथे तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजप उमेदवार सुवेंदुं अधिकारी यांच्यात कांटे की टक्कर आहे.

West Bengal Assembly Election Result 2026 :  सगळ्या देशाच लक्ष भवानीपूरवर, भाजपकडून ममता बॅनर्जी यांना पहिला धक्का, काँटे की टक्कर
mamata banerjee vs suvendu Adhikari
| Updated on: May 04, 2026 | 10:30 AM
Share

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदूच्चेरी. यात सगळ्यांच लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे आहे. सलग तीन टर्मपासून असलेली ममता बॅनर्जी यांची सत्ता भाजपं उलथवणार का? पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलणार का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं होतं. 23 एप्रिल आणि 29 एप्रिल. दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले होते. त्यात बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपला बहुमत दाखवलं होतं. आजचे येणारे निकालाचे आकडे सुद्धा असेच असतील का? हे चित्र पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. यात भवानीपूर विधानसभेच्या जागेवर सर्वांच लक्ष आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील ही हाय-प्रोफाईल सीट आहे. इथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सुवेंदु अधिकारी यांचं आव्हान आहे.

सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांच्यात तालमीत सुवेंदू अधिकारी तयार झाले. आज हा शिष्य बंगालच्या रणसंग्रामात आपल्या गुरुसमोर उभा ठाकला आहे. सुवेंदु अधिकारी आज भाजपत आहेत. कधीकाळी ते ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जायचे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागच्या 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला होता. भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांनीच ममता बॅनर्जी यांना हरवलं होतं.

भवानीपूरमध्ये कोण आघाडीवर?

आता भाजपने भवानीपूरमधून त्यांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उतरवलं आहे. भावनीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने घरातच त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलय. सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरु आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. नंदीग्राम विधानसभा क्षेत्रातून सुवेंदु अधिकारी पुढे आहेत. भवानीपुर विधानसभा सीट दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघात येते. भवानीपूरमध्ये ममता बनर्जी, सुवेंदु अधिकारी, माकपाचे श्रीजीव बिस्वास, काँग्रेसचे प्रदीप प्रदास आणि जेयूपीकडून पूनम बेगम रिंगणात आहेत. यात मुख्य सामना ममता बॅनर्जी आणि सुवेंदु अधिकारी यांच्यात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी