AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly, Baramati and Rahuri By-Election Results LIVE : सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिलेंना विक्रमी मतदान, एक्झिटपोलनुसार..

| Updated on: May 04, 2026 | 7:44 AM
Share

5 State Election Results, Baramati and Rahuri By-poll 2026 LIVE Counting and Updates in Marathi : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळात सुरूवात होईल. बारामती आणि राहुरीच्या मतमोजणीही सुरू होईल.

Assembly, Baramati and Rahuri By-Election Results LIVE : सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिलेंना विक्रमी मतदान, एक्झिटपोलनुसार..
5 State Election Results, Baramati and Rahuri LIVE Counting

LIVE NEWS & UPDATES

  • 04 May 2026 07:43 AM (IST)

    Baramati and Rahuri By-Election Results LIVE : एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिलेंना विक्रमी मतदान..

    एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना विक्रमी मतदान झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढवली तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक लढवली आहे.

  • 04 May 2026 07:41 AM (IST)

    Baramati and Rahuri By-Election Results LIVE 2026 : बारामती आणि राहुरी विधानसभेच्या निकालाकडे राज्याच्या नजरा..

    बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. सुनेत्रा पवार बारामती आणि अक्षय कर्डिले राहुरीची विधानसभेची पोटनिवडणूक लढवली आहे.

  • 04 May 2026 07:36 AM (IST)

    Assembly Results LIVE : मतकेंद्राबाहेर मोठा राडा..

    टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ झाला. शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. भवानीपूरम केंद्राबाहेर मोठा राडा झाला.

  • 04 May 2026 07:33 AM (IST)

    West Bengal Election Result 2026 : महानिकालाला काही वेळातच होणार सुरूवात

    5 राज्य आणि 2 पोटविधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाला काही वेळातच सुरूवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाच्या नजरा आहेत. पश्चिम बंगालच्या निकालाकडे देशाच्या नजरा आहेत.

  • 04 May 2026 07:31 AM (IST)

    Rahuri By-Election Results LIVE : राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी ; एकुण 7 उमेदवार रिंगणात

    56.20% मतदारांनी बजावलाय मतदानाचा हक्क ; सुरूवातीला पोस्टल मतमोजणी. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक. अक्षय कर्डिले यांचे पारडे सुरुवातीपासून जड. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने अक्षय कर्डीले यांचा विजयाचा मार्ग सोपा. भाजपकडून देवेंद्र फडणविस, रविंद्र चव्हाण, विखे पाटील यांच्या जाहिर प्रचारसभा. गोविंद मोकाटे यांच्या प्रचारात मात्र पक्षाच्या मोठ्या नेत्यांची जाणवली अनुपस्थिती. अक्षय कर्डिले आघाडीवर असल्याची चर्चा ; मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष

  • 04 May 2026 07:30 AM (IST)

    Baramati By-Election Results LIVE : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवंगत अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक पार पडतेय. राष्ट्रवादी अजितदादा गटाने देशातील सर्वाधिक मताधिक्याचा रेकॉर्ड करण्याचा संकल्प केला आहे. या पोटनिवडणुकीत सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी म्हणजे साधारण 2 लाख 24 हजार 87 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे हा रेकॉर्ड करण्याची संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आहे.

  • 04 May 2026 07:13 AM (IST)

    aramati and Rahuri By-Election Results LIVE : बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे राज्याच्या नजरा..

    बारामती विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता महायुतीने मोठी कस लावली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत. काही वेळातच निकालाला सुरूवात होईल आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

  • 04 May 2026 07:10 AM (IST)

    Assembly Baramati and Rahuri By Election Results 2026 : 8 वाजता होणार मतमोजणीला सुरूवात..

    देशातील पाच विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. यासोबतच बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचाही निकाल आज आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

  • 04 May 2026 07:09 AM (IST)

    Assembly Baramati and Rahuri By Election Results 2026 LIVE : पश्चिम बंगालमध्ये कोणा मारणार बाजी?

    पश्चिम बंगाल विभासभेच्या निवडणुकीकडे देशाच्या नजरा आहेत. निवडणुकीनंतर मोठे आरोप प्रत्यारोप पश्चिम बंगालमध्ये झाले. मोठा राडा झाला. पश्चिम बंगालची सत्ता आपल्या हाती मिळवण्याकरिता भाजपाकडे जोर लावण्यात आला.

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या विधानसभांचे आज निवडणूक निकाल लागणार आहेत. यासोबतच बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचाही निकाल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली, सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढली आहे. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याही निधनानंतर राहुरीची विधानसभेचे जागा रिक्त झाली. त्यांच्या मुलगा अक्षय कर्डिले यांनी ही पोटनिवडणूक लढवली. राज्यातील या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे आज निकाल आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांची सत्ता आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्याकरिता मोठे प्रयत्न झाले. अगदी थोड्याच वेळात हे निकाल हाती येतील. आसाम, तामिळनाडू आणि केरळच्या विधानसभा निवडणूकीकडे देशाच्या नजरा आहेत. अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होईल. 

Published On - May 04,2026 7:05 AM

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.